मुंबई : "बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला हे मी लवकरच माध्यमांसमोर उघड करणार आहे. त्यांच्या विचारांशी प्रतारणा कुणी केली हेही स्पष्टपणे लवकरच सांगणार आहे. आदित्य यांचे जेवढे वय आहे, त्यापेक्षा आम्ही राजकारणात जास्त वर्ष घालवली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून राजकारण शिकण्याची आम्हाला गरज नाही.", अशी बोचरी टीका करत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. शुक्रवारी (दि. २२ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या भेटीदरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे कौटुंबिक चर्चा सोडून कुठल्याही राजकीय विषयावर आज चर्चा झाली नाही. लवकरच मी पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढणार असून बाळासाहेबांचे विचार राज्यभर पोहचवणार आहे.", असे रामदास कदम यांचे म्हणणे आहे.