'अशा वातावरणात शुटींग करणं म्हणजे वेडेपणा' - अमोल कोल्हे

    16-Jul-2022
Total Views |

kolhe
 
 
 
 
 
 
मुंबई : अशा वातावरणात शूटींग करणे म्हणजे वेडेपणा आहे, आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूटींग? कसं शक्य आहे? अनेकांच्या अनेक शंका.... पण प्रत्यक्ष इतिहास जणू ३५६ वर्षांनंतर त्या घटनेला कॅमेऱ्याच्या लेन्स मधून पाहणार होता.. ASI नियमावलीचे पालन करता करता होणारी दमछाक, त्यात ३८-४० डिग्री असलं तरी ७०% आर्द्रतेमुळे ४२-४४ वाटणारं तापमान ते ही सकाळी ९ वाजता, चुकून टाचणी विसरली तरी किल्ल्यातून बेस कॅम्प पर्यंत पायपीट, ना बसायला खुर्ची ना पंखा.. सावलीसाठी आडोशाला उभं राहावं तर घामाच्या धारा आणि जरा हवेशीर ठिकाणी उभं राहावं तर उन्हाच्या झळा..रोज ४-५ जण अंथरूण धरायचे नाहीतर थेट हॉस्पिटल मध्ये.. तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ' बचेंगे तो और भी लडेंगे' या ईर्षेने शूटिंग सुरु...
 
 
 
kolhe
 
 
पण यात खरं कौतुक करायला हवं ते आमच्या टीम मधील सेटिंग boys, spot boys, light boys, costume dept, direction team, camera team ani junior artists चं..कारण या सर्व प्रतिकूलतेत ते सर्वजण ठाम होते.. महाराजांच्या पेहरावात मी जेव्हा लाल किल्ल्यात पाऊल ठेवलं तेव्हा भारावलेले, अगदी डोळे भरून तो प्रसंग डोळ्यात साठवणारे आणि ३५६ वर्षांपूर्वी घडलेल्या इतिहासाच्या पुनर्प्रत्ययाचे ते सर्वजण पहिले साक्षीदार होते...
 
 
 

kolhe 
 
 
 
 
'Strenght of a Chain is judged by the strength of weakest link in the chain' या उक्ती प्रमाणे टीमची ताकद दाखवून देत होते आणि आमचा टीम leader, आमचा दिग्दर्शक कार्तिक केंढे तर पहाडासारखा त्या प्रतिकूलतेच्या छाताडावर पाय ठेवून उभा होता...मला जाणवत होतं की आपापल्या परीने प्रत्येक मावळा लढत होता..आणि प्रत्येकाची प्रेरणा लाल किल्ल्याकडे स्वाभिमानी नजर रोखून ताठ मानेने उभी होती... शतकानुशकं अजरामर प्रेरणा - छत्रपती शिवाजी महाराज!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121