भारतीय पुरातत्व विभागाकडून ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटक रायगडावर सादर

जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधत विशेष उपक्रम

    20-Apr-2022
Total Views | 87
 
 
raigad
 
 
मुंबई : जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधत सोमवार दि. १८ एप्रिल रोजी स्वराज्याची राजधानी मानल्या जाणार्‍या किल्ले रायगड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय पुरातत्व विभाग आणि मुंबई मराठी साहित्य संघ-नाट्य शाखा यांच्या संयुक्ताने ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या.
 
 
दरम्यान, यावेळी वसंत कानेटकर लिखित ’रायगडाला जेव्हा जाग येते’, या नाटकाचे दिग्दर्शक उपेंद्र दाते, अभिनेत्री अनिता दाते, संध्या वेलणकर, अभिनेते प्रमोद पवार यांच्यासह नाटकाच्या संपूर्ण टीमने नाटक सादर केले. यावेळी ज्या छत्रपती शिवाजी महारांजांनी स्वराज्याची स्थापना करून इतिहास घडवला, त्याच शिवरायांच्या समाधी जवळ नाटकाच्या शुभारंभीचा प्रयोग सादर करून संपूर्ण टीमने एक नवा इतिहास रचला आहे, अशी भावना यावेळी नाटकाचे दिग्दर्शक उपेंद्र दाते यांनी व्यक्त केले. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या पितापुत्राच्या नात्यामधील विविध छटा या नाटकातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हे नाटक पाहात असताना प्रेक्षकांमधील प्रत्येक पितापुत्र नाटकाशी आपोआप जोडला जाईल, असा विश्वास नाटकांतील कलाकारांनी व्यक्त केला आहे.
 
 
याआधी अनेक विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र, यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनेची अर्थात महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारायला मिळाली याचा आनंद होत आहे.
-अनिता दाते, अभिनेत्री
 
 
भारतीय पुरातत्व विभाग ज्या प्रकारे रायगडाचे संवर्धन करत आहे. हे उल्लेखननीय आहे. ज्याप्रकारे व़िभाग रायगाचे संवर्धन आणि संगोपन करत आहे त्याप्रमाणे जिल्ह्यातील इतर किल्ल्यांचे संवर्धनाचे कामही विभागाने हाती घ्यावे.
- आदिती तटकरे, पालकमंत्री (रायगड जिल्हा)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121