मुंबई : देशाच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर गेले काही दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासंबधित आता कुटुंबाने माहिती दिली असून त्यात त्यांनी लतादीदींच्या तब्येती सुधारणा असल्याचे सांगितले आहे. मात्र, तरीही त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवणार असल्याचेदेखील स्पष्ट केले आहे. लता मंगेशकर यांच्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली.
काही दिवसांपूर्वी लतादीदींच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर मंगेशकर कुटुंबीयांतर्फे शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले होते. यावेळी त्यांनी कृपया खोट्या बातम्या पसरवू नका, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता जारी केलेल्या निवेदनात त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. आणखी काही दिवस त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.