मुंबई : गेली काही महिने चर्चेत असलेल्या 'शेरनी'चा अखेर एक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अभिनेत्री विद्या बालन ही एका वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येत आहे. यामध्ये अनेक हरहुन्नरी कलाकार भूमिका बजावत आहेत. येत्या १८ जूनला हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून विद्याने वेगवेगळ्या धाटणीची भूमिका केल्या आहेत. गेल्या वर्षी ‘शंकुतला देवी’ या चित्रपटाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अॅमेझॉन प्राईमच्या शेरनी या नविन चित्रपटाद्वारे विद्या बालन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बुधवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. जंगलाच्या जवळ राहणाऱ्या रहिवास्यांना होणाऱ्या पशुप्राण्याच्या त्रासापासून सोडवण्यसाठी विद्या बालन ची या गावात नियुक्ती होते. वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत असेल्या विद्याला या चित्रपटात एका वाघिणीचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिलेले असतात. असे एकंदरीत या ट्रेलरमधून चित्रपटाची कथा असल्याचे समजत आहे.