मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये जमीन व्यवहार संदर्भात चौकशीचे समन्स पाठवण्यात आले होते.त्यानुसार एकनाथ खडसे यांची ईडी चौकशी आज सात तास झाली. पुण्यातील भोसरी येथील ‘एमआयडीसी’च्या जमीन खरेदी प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी झाली त्याला मी पूर्ण सहकार्य केल्याचे खडसे यांनी माध्यमाना बाहेर आल्यावर सांगितले.
तत्कालीन भाजप सरकारमध्ये महसूल मंत्री पदावर असलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर पत्नी व जावयाकडून पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसी परिसरातील जमीन व्यवहार करण्यात आला होता. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केले होते. मात्र, हा व्यवहार पूर्णपणे खाजगी जमिनीचा झालेला असून कायद्याच्या चौकटीत राहूनच पत्नी व जावयाकडून ही जमीन विकत घेतली गेल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केलेला होता. या अगोदर या संदर्भात ३ तपास यंत्रणांकडून एकनाथ खडसे यांना क्लीनचिट देण्यात आली होती. आपण कुठलीही चुकीची गोष्ट केली नसल्याचे एकनाथ खडसे हे यादरम्यान वारंवार सांगत आले आहेत.मात्र ईडीने ही आज फक्त त्यांना चौकशीसाठी बोलावलं होत. त्यानुसार ते चौकशीसाठी मुंबईतील ईडी कार्यालयात आले होते, ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांना मी सविस्तर उत्तरे दिलेली आहेत, पुढे देखील जी कागदपत्र त्यांना लागतील ती मी देईन. पुढे देखील असेच सहकार्य ईडी कार्यालयात करेन असे खडसे यांनी कार्यालयाबाहेर आल्यावर सांगितले. पुढे देखील ईडी कार्यालयात खडसे यांना चौकशीसाठी यावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात आता ईडीने खडसेंच्या केलेल्या चौकशीतुन काय स्पष्ट होतय ते पाहावे लागणार आहे.