कर्मचाऱ्यांना पगार नाही : एसटीचे राज्याकडे २६८.९६ कोटी थकीत

    22-Jul-2020
Total Views | 55
Uddhav and Anil Parab_1&n



मुंबई : लॉकडाऊन काळातील आणि इतर असे मिळून एसटी महामंडळाचे राज्य सरकारकडे २६८.९६ कोटी थकीत आहेत, अशी माहिती उघड झाली आहे. हा निधी देऊन राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची व्यवस्था करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने परराज्यातील मजुरांना परराज्याच्या सीमेवर पोहचवण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसने मोफत प्रवास करण्याची मुभा दिलेली होती. तसेच प्रवासाचा खर्च शासन देणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु मजुरांनाच्या मोफत प्रवासाचे पैसे मदत व पुर्नवसन खात्याकडून ९४ कोटी ९६ लाख इतकी रक्कम एस.टी. महामंडळास येणी आहे.



तसेच पोलीस वॉरंट, कारागृह वॉरंट, निवडणूक याकरीता एस.टी. बसच्या खर्चापोटी शासनाकडून १४७ कोटी रुपयांची येणी आहे. याशिवाय विविध प्रवास सवलत मुल्यांच्या प्रतिपुर्तीपोटी २७ कोटी रूपये येणे आहे. महाराष्ट्र शासनाकडून सर्व येणी मिळून २६८.९६ कोटी रूपये बाकी आहेत.


एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन ५० टक्के देऊन १०० टक्के कपाती केल्याने निव्वळ वेतन अत्यंत कमी आलेले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलभूत गरजा भागविणे शक्य नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच जुन महिन्याचे वेतन अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.


गुजरात, कर्नाटक, आंधप्रदेश, तेलंगणा यासह विविध राज्यातील एसटी महामंडळास संबंधित राज्यशासनाने एसटी कर्मचा-यांच्या वेतनासाठी अर्थसहाय्य दिलेले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने वेतनासाठी ५०० कोटी रुपये अर्थसहाय्य द्यावे. तसेच मजुर प्रवास, पोलीस वॉरंट, कारागृह वॉरंट, निवडणूक, विविध प्रवास सवलत मुल्यांच्या प्रतिपुर्तीपोटी परतावा असे एकूण २६८.९६ कोटी तात्काळ एस.टी. महामंडळास द्यावे.


राज्य सरकारकडून एसटी महामंडळास २६८.९६ कोटी रुपयांची येणीसह ५०० कोटी रूपये अर्थसहाय्य तात्काळ देऊन एसटी कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे ५० टक्के व जून महिन्याचे संपूर्ण वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने केली आहे.




अग्रलेख
जरुर वाचा
पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121