विद्या बालनचा ‘शकुंतलादेवी’ही ओटीटीच्या वाटेवर!

    15-May-2020
Total Views | 31

shakuntala devi_1 &n


‘गुलाबो-सीताबो’नंतर ‘शकुंतलादेवी’ अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार प्रदर्शित!


मुंबई : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत थिएटर बंद झाल्यापासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. गुरुवारी आयुष्मान खुरानाचा ‘गुलाबो सीताबो’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली होती, आता विद्या बालनचा चित्रपट ‘शकुंतलादेवी’ देखील या व्यासपीठावरून प्रदर्शित होणार आहे.


चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली. हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ‘शकुंतला देवी’ या चित्रपटात विद्या ‘मानवी संगणक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणितज्ञ ‘शकुंतला देवीं’च्या भूमिकेत दिसणार आहे.





या चित्रपटाची कथा काही सेकंदात अत्यंत कठीण गणिते सोडवणाऱ्या शकुंतला देवीच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विद्यासह अभिनेत्री सान्या मल्होत्राही झळकणार आहे. सान्या शकुंतला देवीच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अमित साध आणि जिसू सेनगुप्ता हेदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन अनु मेनन यांनी केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121