'ऐ देश मेरे तू जिता रहे....' कोरोना लढ्यातील त्यांच्या साहसाची गाथा

    29-Apr-2020
Total Views | 48

ITBP _1  H x W:




नवी दिल्ली
: संपूर्ण देश सध्या कोरोनाशी लढा देत आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. अशातच आरोग्यसेवक, पोलीस कर्मचारी व प्रशासन कोरोनाला हरविण्यासाठी २४ तास अविरत सेवा देत आहेत. याप्रसंगी नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी व जनजागृतीसाठी अनेक नवीन प्रयत्न या यंत्रणांकडून होत आहेत. अशातच इंडियन तिबेट सीमा पोलीसचे (आयटीबीपी) जवान हेड कॉन्स्टेबल अर्जुन खेरियल यांनी अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटातील ‘तेरी मिट्टी...’ हे गीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गायले असून ते देशातील कोरोना वॉरियर्सना समर्पित केले आहे. हे गीत गीतकार मनोज मुन्तशिर यांनी लिहिले आहे.





या गीतात अर्जुन यांनी, आयटीबीपीची कोरोनाविरोधातील लढाईचे उत्तम शब्दांकन केले आहे. त्यांनी हे गीत सर्व संरक्षण कर्मचारी, पोलीस दल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोनाचा सामना करणाऱ्या त्या सर्व बहादूर लोकांना समर्पित केले आहे. या व्हिडिओत आपणास आयटीबीपीमार्फत करण्यात येत असणाऱ्या मदतीची माहिती देखील देण्यात आली आहे. आयटीबीपीच्या जवानाने गायलेल्या या गाण्यात भावुकता, राष्ट्र प्रेम आणि आत्मविश्वासाची झलक पाहायला मिळते. या गीतातून आयटीबीपीसह सर्वच केंद्रीय दलांमधील राष्ट्रीय आपत्तीच्या काळातील साहस आणि बलिदानही सांगणारे हे गीत आहे.









पीपीई किटची निर्मितीत आयटीबीपीची भूमिका



आयटीबीपीने त्यांच्याकडे उपलब्ध असलेली संसाधने वापरूनच पीपीई किट आणि मास्कदेखील तयार केले. एवढेच नाही, तर अनेक संघटनांना ते निःशुल्क वितरितही केले. लॉकडाउनच्या काळात आयटीबीपीने देशातील दुर्गम भागांमध्ये जाऊन रसद आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यातही मोलाचा वाटा उचलला. याशिवाय, हजारो लोकांना भोजन आणि इतर सामग्रीही उपलब्ध करून दिली.


देशातील पहिले क्‍वारंटाइन सेंटर

कोरोनाचा देशात प्रसार होण्यापूर्वीच आयटीबीपीने देशातील पहिले १००० बेडची व्यवस्था असणारे क्वारंटाइन सेंटर नवी दिल्ली येथील छावला भागात सुरू केले होते. येथे वेगवेगळ्या दलांतील जवळपास १२००जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121