येस बॅंकेचा संचालक राणा कपूरच्या घरावर ईडीचा छापा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2020
Total Views |
Smudra Mahal _1 &nbs

 
 

कर्जवाटपाची खिरापत भोवणार


मुंबई : येस बॅंकेवर निर्बंध आणल्यानंतर आता सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईचा फास आवळण्याची सुरुवात केली आहे. बँकेचे संचालक राणा कपूरच्या घरावर अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने रात्री उशीरा छापे टाकले. संस्थापक कपूरविरोधात ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल केला. याच संदर्भात ईडीचे एक पथक राणा कपूरच्या मुंबईतील समुद्र महल टॉवर येथील घरावर पोहोचली होती.
 
 
 
शुक्रवारी रात्री काय झाले ?
 
 
शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत संपूर्ण घराची झडती घेण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेने डबघाईला गेलेल्या येस बँकेच्या ग्राहकांवर केवळ ५० हजारांच्या व्यवहाराची अट घातली असून येस बँकेचे सर्वच व्यवहार पुढील ३० दिवसांसाठी आता रिझर्व्ह बँकेकडे आहेत. बँकेच्या सध्याच्या परिस्थितीसाठी संस्थापक, माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राणा कपूर हेच जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे.
 
 
 
खिरापत कर्जवाटपांची
 
 
राणा कपूरवर मोठ-मोठ्या उद्योग समूहांना कर्ज देणे आणि सोयीनुसार वसूली करण्याचे आरोप आहेत. आपल्या वैयक्तिक संबंधांद्वारे कर्जवाटपाची खिरापत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे त्यांची आता कसून चौकशी होणार आहे.
 

कोणाकोणाला वाटले कर्ज
 
 
येस बँकेच्या कर्जदारांमध्ये अनिल अंबानी ग्रुप, आयएलअँडएफएस, सीजी पावर, एस्सार पॉवर, रेडिअस डेव्हलपर्स आणि मंत्री ग्रुपसारख्या उद्योग समूहांचा समावेश आहे. या ग्राहकांना डिफॉल्टर (कर्जबुडवे) घोषित केल्यानंतर बँकेवर संकट ओढावले. २०१७मध्ये बँकेने ६ हजार ३५५ कोटी रुपयांची रक्कम वसुली करण्यास शक्य नसल्याने बॅड लोन कॅटेगरीमध्ये टाकले. तेव्हापासूनच आरबीआयची या बँकेवर करडी नजर होती.
 
 
बॅंक अध्यक्षाला हटवण्याची पहिलीच वेळ
 
 
२०१८मध्ये आरबीआयने राणा कपूरवर कर्ज आणि ताळेबंदात घोळ केल्याचे आरोप होते. यानंतर कपूरला बॅंक अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. बँकिंग इतिहासात एका चेअरमनला अशा प्रकारे हटवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
@@AUTHORINFO_V1@@