पाकिस्तानमध्ये संपूर्ण लाॅकडाऊनला इम्रान खान यांचा नकार

    31-Mar-2020
Total Views | 92
imran khan _1  
 
 
 

रिलीफ फंडात देणगी देणाऱ्या नागरिकांनाच सवलती

 
 
 
मुंबई (प्रतिनिधी) - पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजलेला असताना देखील पंतप्रधान इम्रान खान यांनी संपूर्ण लाॅकडाऊन घोषित करण्यास नकार दिला आहे. संपू्र्ण लाॅकडाऊन जाहीर झाल्यास देशात अशांतता निर्माण होईल. तसेच आम्ही देशातील सर्व जनतेला अन्न पुरवू शकत नाही. त्यामुळे जनतेवर लाॅकडाऊनही लादू शकणार नाही, असे खान यांनी सोमवारी रात्री पाकिस्तानी जनतेला संबोधित करताना म्हटले.
 
 
 
पाकिस्तानात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना बिधातांची संख्या १,७२७ वर पोहोचली आहे. या परिस्थितीत पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी रात्री देशाला तिसऱ्यांदा संबोधित केले. यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही पाकिस्तानमध्ये संपूर्ण लाॅकडाऊन जाहीर करु शकत नाही. असे केल्यास देशात अशांतता पसरेल. आम्ही चीनसारखे असलो तर नक्कीच देश बंद केला असता. परंतु, आमचे २५ टक्के लोक दारिद्यरेषेखालील आहेत. लाॅकडाऊन जाहीर केल्याास ८० मिलियन गरीब लोकांना त्याच्या फटका बसेल. यावेळी खान यांनी कोरोना रिलीफ टायगर फोर्सची स्थापना करत असल्याचे घोषित केले. ही फोर्स सरकार आणि सुरक्षा यंत्रणांसोबत काम करेल. तसेच आम्हाला लाॅकडाऊन जाहीर करणे भाग पडल्यास ही फोर्स लोकांना अन्न पुरवेल, असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
महत्त्वाचे म्हणजे बुधवार पासून खान पाकिस्तानमध्ये कोरोना रिलीफ फंडाची सुरुवात करणार आहेत. मात्र, या फंडामध्ये जे लोक देणग्या देतील त्यांनाच सवलती मिळणार आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एनडीएमए) प्रमुख लेफ्टनंट जनरल मुहम्मद अफझल म्हणाले की, देशात कोरोनाच्या चाचणीची क्षमता वाढविण्यासाठी नवीन लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत आणखी वैद्यकीय उपकरणे चीनमधून आयात केली जातील. त्यासाठी येत्या तीन ते चार दिवसांमध्ये काही विमाने चीनला जाऊन तिथून आवश्यक वस्तू घेऊन येणार असल्याचे अफजल यांनी सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा
पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपो हा महाराष्ट्रातील काही प्रमुख मोठ्या बस आगारांपैकी एक मानला जातो. कोकण, तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या वाहतुकीसाठी पनवेल डेपो महत्वाचा आहे. पनवेल बस डेपोमधून दिवसाला अडीच हजार गाड्या ये-जा करतात. अशा स्थितीमध्ये पनवेल बस डेपोची अवस्था ही फार दयनीय झालेली आहे. अशावेळी पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न मार्गी लागावा याकरिता तात्काळ कार्यवाही करा, तसेच दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावरही तात्काळ कारवाई करा, अशी मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121