तब्बल १३ वर्षानंतर 'भूलभुलैय्या' हा चित्रपट एका नव्या अवतारात येत आहे. 'भूलभुलैय्या २' मध्ये कार्तिक आर्यन हा सध्याचा आघाडीचा अभिनेता आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आज त्याच्या चित्रपटातील भूमिकेचा पाहिला लूक चित्रपटकर्त्यांनी प्रदर्शित केला. हा लूक खूपच चमत्कारिक आहे पण त्याचवेळी या लूकमध्ये अक्षय कुमारच्या 'भूलभुलैय्या' चित्रपटामधील झलक दिसत आहे. या आधी अक्षय कुमार आणि विद्या बालन यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले आहे. त्यामुळे या चित्रपटामध्ये प्रेक्षकांचे मन जिंकण्याची जबाबदारी आता कार्तिक आर्यनवर आहे. पुढील वर्षी ३१ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर आहे. त्यामुळे आता ती छाप पुसून आपला नवीन ठसा उमटवणे कार्तिक आर्यनसाठी एक आव्हान असेल. मात्र, प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी चित्रपटकर्त्यांनादेखील विशेष प्रयत्न करावे लागतील, हेदेखील तितकेच महत्वाचे आहे.
कार्तिक आर्यन सध्या त्याची तथाकथित गर्लफ्रेंड सारा अली खानबरोबर 'लव्ह आजकल २' आणि जान्हवी कपूर बरोबर 'दोस्ताना २' या दोन चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. त्यात 'भूलभुलैय्या' या चित्रपटाची आता भर पडली आहे. आज प्रदर्शित झालेल्या त्याच्या लूकमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.
Meet the new ghostbuster in town! #BhoolBhulaiyaa2 starts soon...@TheAaryanKartik @itsBhushanKumar @MuradKhetani @ashwinvarde #KrishanKumar @farhad_samji #AakashKaushik @BhoolBhulaiyaa2@TSeries @Cine1Studios pic.twitter.com/ka1c04DyNp
— Anees Bazmee (@BazmeeAnees) August 19, 2019