एबीसीडी २ नंतर आता स्ट्रीट डान्सर या चित्रपटामधून पुन्हा एकदा वरुण धवन डान्स करताना झळकणार आहे. अफाट परिश्रम, कष्ट आणि सरावानंतर आज अखेर 'स्ट्रीट डान्सर थ्री डी' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याची घोषणा आज वरुण धवनने केली. "अँड इट्स अ व्रॅप" असे म्हणत सोशल मीडियावरून त्याने काही फोटो शेअर केले.
वरुण धवन हा एक अतिशय हरहुन्नरी कलाकार असून आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमधून त्याने लोकांची मने जिंकली आहेत.'स्ट्रीट डान्सर थ्री डी' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर त्याने आपल्या भावना व्यक्त करताना, या चित्रपटाशी आणि चित्रपटात काम करणाऱ्या सहकलाकारांविषयी असलेल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही इतके आमचे प्रेमाचे नाते या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माण झाले आहे. असे म्हणत त्याने हा चित्रपट साकार करण्यासाठी काम केलेल्या प्रत्येकाचे आभार मानले.
'स्ट्रीट डान्सर थ्री डी' हा चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित होणार असून वरुण धवन बरोबर श्रद्धा कपूर देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे.
Its a WRAP on #StreetDancer3D. I cant explain my emotions all I can say is I love the people involved with this film and that we are all connected. Thank you to all the teams and dancers from all over the world who have come together to make this film happen #jan24 #family pic.twitter.com/FfTDsRHVD8
— VarunDhawan (@Varun_dvn) July 27, 2019
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat