राज्य सरकारने महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना फडणवीस सरकारने मोठी खुशखबर दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांकडून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी होत होती. मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २ सप्टेंबरपासून महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याला मान्यता देण्यात आली आहे.
सातवा वेतन लागू झाल्याने मनपा आणि नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ झाली आहे. त्यामुळे या निर्णयाचे कर्मचारी वर्गातून आनंद व्यक्त आहे.