कौतुकास्पद ; लष्कर उपप्रमुखपदी मराठमोळे लेफ्टनंट जनरल एम एम नरवणे

    23-Jul-2019
Total Views | 41




नवी दिल्ली : केंद्र सरकारने लष्करात नव्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापदी नियुक्ती झालेले ते पहिलेच मराठी अधिकारी आहेत. विद्यमान लष्कर उपप्रमुख देवराज अंबू ३१ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. अंबू हे ३१ डिसेंबरला निवृत्त होणार असून यांच्याकडून नरवणे सूत्रे स्वीकारतील.

 

लेफ्टनंट जनरल नरवणे गेल्या ३७ वर्षांपासून भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत आहेत. याआधी त्यांनी इन्फंट्री ब्रिगेडचंही नेतृत्त्व केले आहे. जम्मू-काश्मीरमधील घुसखोरांना यमसदनी पाठवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला होता. ही बालाकोट मोहीम फत्ते करण्यात चौहान यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

 

लष्करप्रमुखपदासाठी लेफ्टनंट जनरल नरवणे शर्यतीत

 

विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत ३ वर्षांच्या कार्यकाळानंतर यावर्षी डिसेंबर महिन्यात निवृत्त होणार आहे. त्यामुळे लष्करप्रमुखपदासाठी एम एम नरवणे तसेच सैन्याचे उत्तरेतील कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांचे नाव चर्चेत आहे. नरवणे यांची नियुक्ती झाल्यास त्यांच्या रुपाने मराठी व्यक्तीची लष्करप्रमुखपदी निवड होईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121