'लूटकेस' चित्रपटाचा गमतीदार टीजर प्रदर्शित

    20-Jun-2019
Total Views | 34


 

राजेश कृष्णन दिग्दर्शित 'लूटकेस' या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. कुणाल खेमू, रसिक दुग्गल, गजराज राव, रणवीर शौरी आणि विजय राज अशी या चित्रपटामधील स्टारकास्ट आहे. टीजरमध्ये एक लाल रंगाची सुटकेस असून या सुटकेसचे आत्मवृत्त दाखवण्यात आले आहे. टीजरमध्ये सूटकेसनेच सर्वांना ही सूटकेस कोणाची आहे? असा प्रश्न विचारला आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर चित्रपटात दडले आहे.

 

या चित्रपटाच्या नावावरून आणि नुकत्याच आलेल्या टीजरवरून हा चित्रपटामध्ये या सुटकेसचा सुद्धा महत्वाचा सहभाग असल्याचे जाणवते. मात्र नेमके या सुटकेसचे चित्रपटाच्या कथेमधील महत्व काय याचे रहस्य मात्र अजून उलगडलेले नाही. फॉक्स स्टार स्टुडिओज यांची निर्मिती असलेला 'लूटकेस' हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121