मुंबई : मागील पाच वर्षांत विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीवरील रहिवाशांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर उत्तर-मध्य मुंबईच्या पुनर्निवाचित भाजप खा. पूनम महाजन यांनी आता ‘फनेल झोन’मध्ये येणार्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केले आहे.
‘फनेल झोन’ तसेच मतदारसंघातील अन्य विषयांसंदर्भात महाजन यांनी शुक्रवारी आ. पराग अळवणी यांच्या समवेत मतदारसंघातील भाजप नगरसेवकांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळासह मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेतली.
या संदर्भात चर्चेदरम्यान आयुक्तांनी ‘फनेल झोन’ संदर्भातील अहवाल दि. २१ जूनपर्यंत राज्य सरकारकडे दाखल करणार असल्याचे सांगितले. अहवालराज्य सरकारकडे गेल्यानंतर एक महिन्याच्या आत राज्य सरकारच्या शहर विकास विभागाकडून या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याच्या दिशेने पावले उचलली जातील.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat