इस्त्रो करणार ऐतिहासिक कामगिरी ! भारताकडे असेल स्वतःचे 'स्पेसस्टेशन'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |




नवी दिल्ली : भारताकडे आता स्वतःचे स्पेस स्टेशन असेल, असा विश्वास इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने तयारीही सुरू झाल्याची माहीती त्यांनी बुधवारी दिली. के. सिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आता स्वतःचे स्पेस स्टेशन सुरू करण्याची योजना आखत आहे. 'इस्त्रो'चे मिशन 'गगनयान'ची ही विस्तार योजना आहे. २०२१ पर्यंत भारताने अंतराळात मानव पाठवण्याची योजना आखली आहे. 'गगनयान' योजनेद्वारे ही कामगिरी शक्य आहे. ही कामगिरी वेळेत पूर्ण झाल्यास भारत अंतराळात मानव पाठवणारा जगातील चौथा देश ठरणार आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन गगनयानची घोषणा केली होती. 'चंद्रयान-' श्री हरीकोट्टा येथून १५ जुलै रोजी मध्यरात्री रवाना होणार आहे. इस्त्रो सध्या आपल्या ३.५ टन वजनी उपग्रहला अंतिम रूप देत आहे. या प्रकल्पावर एकूण ६०० कोटींचा निधी खर्च झाला आहे. चंद्रावरील ज्या ठिकाणी कोणताही देश किंवा अंतराळवीर पोहोचू शकला नाही, अशा भागात हे यान उतरवले जाणार आहे. सध्या इस्त्रो अशा जटील प्रकल्पांवर कार्यरत आहे त्यांचा अंदाजित खर्च हजार कोटींच्या आसपास आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@