सरन्यायाधीश रंजन गोगई यांना ‘क्लीनचिट’

    06-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगई यांना क्लीनचिट मिळाली आहे. एका महिलेने त्यांच्यावर मानसिक व लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय समितीने केलेल्या सुनावणीत या महिलेच्या आरोपात कोणतेही तथ्य आढळले नसल्याने गोगई यांना क्लीनचिट देण्यात आली.

 

सर्वोच्च न्यायालायातील माजी कर्मचारी असलेल्या या महिलेने २२ न्यायाधीशांना प्रतिज्ञापत्र लिहून गोगई यांच्यावर हे खळबळजनक आरोप केले होते. ही महिला गोगोई यांची जुनी सहकारी असून ती सुप्रीम कोर्टात ज्यूनियर कोर्ट असिस्टंट म्हणून काम करत होती. या महिलेच्या आरोपानंतर न्यायमूर्ती एस. ए बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.

 

न्या. एस. ए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने या महिलेचे आरोप फेटाळत आपला रिपोर्ट जमा केला आहे. न्या. गोगई यांच्यावर केलेले आरोप हे निराधार असून ही सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध मोठा कट रचण्यात आल्याचे सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat