पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बॉलिवूडकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

    24-May-2019
Total Views | 33


 

भारतीय जनता पक्षाच्या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आवाजी मतांनी देशात पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेत आले असून एकशे तीस कोटी भारतीय नागरिकांच्या कल्याणाचे काम करण्यास सज्ज झाले आहे. अशातच चित्रपट सृष्टीतील कलाकार कसे मागे राहतील. त्यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. लोकांचे मत हे सर्वोच्च मानणाऱ्या भाजप सरकारला मिळालेल्या शुभेच्छा ही त्यांच्या आत्तापर्यंतच्या कामाची पावती आहे असेच म्हणावे लागेल.

 

या कलाकारांची यादी खूप मोठी आहे. यामध्ये ऋषी कपूर, लता मंगेशकर, आशा भोसले, अनुपम खेर, शबाना आझमी यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांबरोबरच सलमान खान, रविना टंडन, सोनम कपूर, राजकुमार राव, करन जोहर, अक्षय कुमार, कपिल शर्मा या आणि आशा अनेक कलाकारांनी नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 
 

 
 
 
 
  
 

या शुभेच्छा तर आहेतच मात्र देशातल्या एवढ्या मोठ्या संख्येत असेलेल्या सामान्य नागरिकांचा प्रचंड पाठिंबा बीजेपी सरकारला मिळाला आहे. देशातील बहुसंख्य जनतेचा पाठिंबा आणि शुभेच्छा मोदी सरकारला पुढील ५ वर्षे आणखी जोमाने काम करण्यास प्रोत्साहन देत राहतील यात शंका नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121