तुरळक घटना वगळता मतदान शांततेत : निवडणूक आयोग

    11-Apr-2019
Total Views | 29




नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात २० राज्यांतील मतदान शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडले असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. विशेष करून बस्तर आणि दंतेवाडा या नक्षलप्रभावित लोकसभा मतदारसंघात भयमुक्त वातावरणात मतदान झाल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.


विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघासह देशभरातील ९१ लोकसभा मतदारसंघात गुरुवारी पहिल्या टप्प्प्यातील मतदान पार पडले. त्यानिमित्त निवडणूक आयोगाचे उपायुक्त उमेश सिन्हा यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. आम्ही देशभरातील पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. नक्षलग्रस्त दंतेवाडा भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या भागातही मतदान शांततेत पार पडले. देशातील ९१ लोकसभा मतदारसंघात १ लाख ७० हजार मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात मोठ्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारही होते. देशभरात ६.८७ कोटी महिला आणि १४ लाख दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
 


राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी


आंध्रप्रदेश (२५ जागा) ६६ टक्के
छत्तीसगड (१ जागा) : ५६ टक्के
अंदमान निकोबार (१ जागा) : ७०.६७ टक्के
तेलंगणा (१७ जागा) : ६०.५७ टक्के
बिहार: ५०. २६ टक्के
मेघालय: ६२ टक्के
उत्तर प्रदेश: ५९.७७ टक्के
मणिपूर: ७८.२० टक्के
लक्षद्वीप: ६५.९ टक्के
आसाम: ६८ टक्के
उत्तराखंड (५ जागा) : ५७.८५ टक्के
जम्मू-काश्मीर (२ जागा) : ५४.४९ टक्के

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121