मुंबई : बीसीसीआयने अंडर-१९ विश्वचषकासाठी १५ जणांच्या नावाची घोषणा केली आहे. प्रियम गर्गकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर विकेटकीपर ध्रुव चंद जुरेलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. मेरठमध्ये राहणाऱ्या प्रियमची घरची परिस्थितीही बेताची आहे. वडील नरेश गर्ग टॅक्सी चालवायचे. पण त्यांनी कधी मुलाला स्वप्न पूर्ण कारण्यापासून रोखले नाही.
अंडर १९ विश्वचषक २०२०चे आयोजन दक्षिण आफ्रीकेमध्ये केले आहे. या सामान्यांची सुरुवात १७ जानेवारीपासून होईल तर अंतिम सामना ९ फेब्रुवारीला होणार आहे. भारताचा पहिला सामना श्रीलंकेसोबत १९ जानेवारीला आहे. ४ वेळा अंडर-१९ विश्वचषक आपल्या नावावर केलेला भारतीय संघ 'ग्रुप-ए'मध्ये आहे तर पाकिस्तानी संघ 'ग्रुप-सी'मध्ये आहे. भारताचा पहिला सामना श्रीलंकेसोबत, दुसरा सामना जापान आणि तिसरा न्यूझीलंडसोबत होणार आहे. यावेळेस एकूण १६ संघानी विश्वचषकामध्ये भाग घेतला आहे.
Four-time winner India announce U19 Cricket World Cup squad. Priyam Garg to lead the side. pic.twitter.com/VEIPxe2a2n
— BCCI (@BCCI) December 2, 2019
असा असेल भारतीय संघ
प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव चंद जुरेल (यष्टिरक्षक आण उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), सुशांत मिश्र, विद्याधर पाटील.