अभिनेता अजय देवगणच्या ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटातलं पहिलं गाणं मंगळवारी सकाळी प्रदर्शित करण्यात आलं. ‘शंकरा रे शंकरा’ या गाण्यात अजयचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या चित्रपटात अजय देवगण आणि काजोलची जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
हा चित्रपट अजयचा बॉलिवूडमधील १००वा चित्रपट असल्याने, त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहेच, तब्बल १२ वर्षांनी अजय-काजोल जोडी पडद्यावर एकत्र दिसणार असल्याने खूप खासही आहे. या चित्रपटात अजय ‘तान्हाजीं’च्या भूमिकेत तर काजोल त्यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी बॉक्सऑफिसवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.