मुंबई : पेटीएम ह्या भारताच्या सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट कंपनीची मालकी असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने शुक्रवारी जाहीर केले की झोमॅटोशी त्यांनी भागीदारी केली असून त्यांच्या मोबाइल अॅपच्या माध्यमातून फूड आणि डिलिव्हरी ऑर्डर करता येईल. यामुळे यूझर्स आता आपल्या पेटीएम अॅपमधून आपले आवडते रेस्टोरंट शोधून तत्काळ खाद्यपदार्थ मागवू शकतील. ही सेवा सध्या दिल्ली-एनसीआरच्या ग्राहकांसाठी पेटीएम अँड्रॉइड अॅपवर सक्रिय झालेली आहे आणि लवकरच ती भारतभरात आणि पेटीएम आयओएस अॅपवर देखील सक्रिय होईल.
पेटीएमच्या उपाध्यक्ष रेणू सत्ती म्हणाल्या, “झोमॅटोसह भागीदारीच्या मदतीने आमच्या अॅपवरून ऑनलाइन फूड ऑर्डरकरण्याची सोय झाली आहे. आमच्या ग्राहकांपैकी मोठ्या प्रमाणातील ग्राहक हे टियर २ आणि टियर ३ शहरांतील आहेत. आम्हाला विश्वास आहे की या सहयोगानंतर ऑनलाइन फूड ऑर्डरिंगमधील वाढ आम्ही आणखी जोमाने पुढे नेऊ.आमच्या ग्राहकांना सर्व प्रकारची सेवा देण्याच्या आमच्या प्रयासातील देखील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही या दिशेने आमचे प्रयत्न सदैव सुरू ठेवू.”
झोमॅटो फूड डिलिव्हरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित गुप्ता म्हणाले, “पेटीएम हा सर्वाधिक लोकप्रिय पेमेंट मंच आहे, ज्यांची पोहोच देशाच्या कान्या-कोपर्या पर्यंत आहे. त्यांच्याशी भागीदारी करून आमची ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवा त्यांच्या मोबाइल अॅपशी जोडण्यास आम्ही उत्सुक आहोत. यामुळे आम्ही आणखी मोठ्या यूझर-बेसपर्यंत पोहोचू शकू आणि झोमॅटोवरून ऑर्डर करण्याचा एकंदर अनुभव अधिक चांगला करू शकू.”
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/