...असा होता मोदींचा आत्तापर्यंतचा प्रवास

    17-Sep-2018
Total Views | 33

 

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा आज ६८वा जन्मदिन आहे. जगभरात पंतप्रधान मोदी प्रसिद्ध आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्वच प्रत्येकाला त्यांच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे. गुजरातच्या छोट्याशा गावात जन्मलेले नरेंद्र मोदींचा आज पूर्ण जगावर प्रभाव आहे. मोदींच्या आयुष्यातही खूप चढ-उतार राहिले. नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील आणि त्यांच्या जन्माशी संबंधित काही रंजक किस्से बहुतेकांना माहिती नाहीत.
 
 

 
 

· लहानश्या खेड्यात जन्म : गुजरातच्या वाडनगर नावाच्या एका गावात नरेंद्र मोदींचा जन्म झाला. या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सातव्या शतकात भारत दौऱ्यावर आलेल्या चिनी इतिहासकार हुआन त्संगनेही वाडनगर आणि त्याच्या पार्श्वभूमीचे कौतुक केले होते.

 
 

· रेल्वेत चहाविक्री : नरेंद्र मोदींना सहा भाऊ-बहिणी. भावंडांमध्ये ते तिसरे. घरची परिस्थिती बेताची यामुळे त्यांच्या वडिलांना वाडनगर रेल्वे स्टेशनवर चहासुद्धा विकावा लागला. तेव्हा नरेंद्र मोदीही त्यांना मदत करायचे आणि त्यांनी रेल्वेत चहासुद्धा विकला.

 
 
 

· टोपण नाव : साधारणपण जसे सर्वांचे काही ना काही टोपण नाव असते, तसेच नरेंद्र मोदींचेही होते. लहानपणी मोदींना सर्वजण नरिया म्हणून हाक मारायचे. नरेंद्र मोदींच्या आई आजही त्यांना प्रेमाने नरिया म्हणून हाक मारतात. अभ्यासाच्या बाबत नरेंद्र मोदी साधारणच होते. तथापि, त्यांच्या वादविवाद करण्याच्या पद्धतीचे शिक्षकही कौतुक करत.

· अभिनयातही रूची : नरेंद्र मोदींना अभिनयाचीही आवड होती. यासाठी त्यांनी रंगभूमीवरही काम केले. नाटकांमध्ये खूप रूची घेत होते.

 

 
 

· देशसेवेसाठी सन्यास : शिक्षणानंतर मोदींच्या मनात संन्यास घेण्याचीही इच्छा झाली. यासाठी त्यांनी घराचा त्याग केला. दरम्यान त्यांनी पश्चिम बंगालच्या रामकृष्ण आश्रमाशिवाय अनेक जागी भ्रमण केले. या काळात त्यांची अध्यात्मात श्रद्धा आणखी वाढली. यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रीय झाले.

 

 
 

· खट्याळ स्वभाव : लहानपणी नरेंद्र मोदी कुणालाही अडचणीत पाहून लगेच मदतीला धावायचे. एकदा 'मन की बात' कार्यक्रमात मोदींनी खुलासा केला की, कशा प्रकारे ते शहनाई वादकांना चिंचेचे आमिष दाखवून त्यांचे ध्यान भंग करायचे.

 

· संसाराचाही त्याग : लहानपणी नरेंद्र मोदींचा साखरपुडा शेजारी राहणाऱ्या जशोदाबेनशी करण्यात आला. परंतु मोदींच्या मनात देशसेवेची इच्छा प्रबळ होती. त्यांना स्वत:ला घराच्या जबाबदारी न बांधून घेता आपले देशसेवेचे स्वप्न पूर्ण करायचे होते. जशोदाबेन यांना अभिमान वाटतो की, नरेंद्र मोदींनी देशसेवेसाठी लग्नाचा त्याग केला.

 
 

· राजकीय प्रवास : १९७५ साली आणीबाणी घोषित झाल्यानंतर ते लोक संघर्ष समितीचे महासचिव झाले. २००१ ते २०१४ पर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री होते.


 
 

· युवा वर्गाचे आकर्षण : नरेंद्र मोदी २०१४ नंतर देशातील युवा वर्गाचे खास आकर्षण बनले. २०१४च्या लोकसभा निवडणूकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. नरेंद्र मोदी लहान मुले आणि विद्यार्थ्यांचे फार आकर्षण आहेत. पुण्यातील ७ वर्षांच्या वैशालीच्या हृदयात छिद्र असल्याने ती उपचार घेत होती. मदतीसाठी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले. त्यानंतर मोदींनी मदत तर केलीच मात्र, तिची भेट घेत तिचा आजारापासून लढण्याची उर्जा दिली. मोदींनी तिचा उपचार पूर्ण मोफत करण्यास सांगितला.

 

      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121