रंगातील संवेदनशीलता

    31-Aug-2018
Total Views | 38



शैलीतील आणखीही इतर कलाकृती या प्रदर्शनात पाहावयास मिळतात. रंगयोजनांमधील शिस्तीची श्रीमंती विषयघटकांची मांडणी आणि आशय जपण्यासाठी घेतलेली काळजी या तीन वैशिष्ट्यांवर गोपाळ नांदुरकरांची प्रत्येक कलाकृती सजलेली आहे. दि. ३ सप्टेंबरपर्यंत त्यांचे हे प्रदर्शन पाहता येईल.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

‘कलाकारांची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या जहांगीर कलादालनात चित्रकार गोपाळ नांदुरकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन सध्या सुरू आहे. चित्रकार हा संवेदनशील असतो. गोपाळ नांदुरकर म्हणतात की, ‘‘चित्रकाराच्या संवेदनशील दृष्टीने जीवनाकडे आणि निसर्गाकडे पाहताना प्रकर्षाने जाणवणाऱ्या चित्रनिर्मितीच्या शक्यता मला चित्रामागील संकल्पना देऊन जातात. कधी समोरच्या दृश्यातील रेषा आणि आकारांच्या आकृतीबंध, कधी छायाप्रकाशाच्या मनोहारी दृश्यांचा खेळ, कधी विलोभनीय रंगसंगती, तर कधी त्या दृश्यातील विविध पैलू व अलंकारिक आकार यांचा मिलाफ... या गोष्टी चित्रांच्या संकल्पना बनत या चित्रसंकल्पांना मूर्त रूप देताना दृश्य सौंदर्याचा शोध सतत सुरू असतो.” हे सांगतानाच चित्रकार गोपाळ सांगतात की, त्यांच्या चित्रांद्वारे जीवनातील सकारात्मकता व कलेतील सौंदर्यपूर्ण आनंद रसिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न असतो. त्यांची एक कलाकृती आहे, ज्यात एक साधे ‘वेळू’चे अर्थात ‘बांबू’चे बेट आहे. बाजूला दगडांचा ढीग आहे. बस्... चित्रविषयाचे मुख्यतः हे दोनच घटक आहेत. मात्र, निळ्या-हिरव्या रंगाच्या बांबूंच्या सरळसोट झाडांवर पडलेला प्रकाश, निळ्या रंगातील विविध छटा, दगडांवरील छायाभेद आणि बांबूंच्या पानांच्या सळसळीतील नैसर्गिकपणा चित्रकाराने अचूक टिपलेला आहे. ही कलाकृती साकारताना रंगातील पारदर्शकपणा आणि रंगांचे ‘रेंडरिंग’ हे सातत्याने केलेल्या मेहनतीमुळे प्रभावीपणे चितारलेले आहे.

 

सहा बदकांची चर्चा जणू चालली आहे, असे कथन करणारे एक चित्र आहे. ज्या फरशीवर वा जमिनीवर ते विविध दिशांना तोंड करून आपापसात काहीतरी गुजगोष्टी करताना भासतात, ते फारच सूक्ष्मपणे चित्रकाराने चितारले आहे. त्यांच्या नेहमीच दिसणाऱ्या शैलीतील कलाकृतींपेक्षा आणखी काही कलाकृती जरा वेगळ्या म्हणण्यापेक्षा ‘मधुबनी’ किंवा ‘राजस्थानी शैलीं’ची आठवण करून वाटतात. नंदीबैलाला पुरातन काळापासून मान आहे, ओळख आहे, हे सांगणारी कलाकृती स्मृतिप्रवण आहे. या शैलीतील आणखीही इतर कलाकृती या प्रदर्शनात पाहावयास मिळतात. रंगयोजनांमधील शिस्तीची श्रीमंती विषयघटकांची मांडणी आणि आशय जपण्यासाठी घेतलेली काळजी या तीन वैशिष्ट्यांवर गोपाळ नांदुरकरांची प्रत्येक कलाकृती सजलेली आहे. दि. ३ सप्टेंबरपर्यंत त्यांचे हे प्रदर्शन पाहता येईल.

 

पॅपिलॉन

‘कलाकारांची आळंदी’ म्हणून संबोधले जाते, ते कालाघोडा, फोर्ट जवळच्या ‘आर्टिस्ट सेंटर’ या कलादालनाला. या सप्ताहात, सर जे. जे. स्कूलमधून पदव्युत्तर पदवी घेऊन बाहेर पडलेल्या दोन तरुण चित्रकारांनी त्यांचे चित्रानुभव ‘पॅपिलॉन’ नावाने या दालनात प्रदर्शित केले आहेत. चित्रविषय हा त्या त्या कलाकाराच्या चित्रप्रतिभेवर आणि कल्पनाशक्तीवर ठरवला जातो. रितेश भोई या तरुण चित्रकाराने त्याच्या अनुभवांवरच त्याच्या कलाकृतींचे विषय तसेच घटक मांडणी केलेली आहे. समाजात वावरताना आपण काही निरीक्षणे करीत असतो. त्यांचा परिणाम आपल्या जीवनांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे होत असतो. तसाच तो रितेशवरदेखील परिणाम करणारा ठरला. रितेशच्या कलाकृतीही आशयगर्भ आहेत. आपल्याला षडरिपूंचा म्हणजे राग-द्वेष-मोह अशा बाबींचा अनुभव येत असतो. तसाच रितेशनेही घेतला आहे. त्याने हा अनुभव रंगछटा, टेक्सचर(पोत) आकार यांच्यामार्फत व्यक्त केला आहे. रितेश बरोबरच त्याची सहकारी तरुण चित्रकर्ती सोनल अग्रवाल हिच्या कलाकृतीही एका विशिष्ट आशयाला धरून आहेत. सोनलने बादल म्हणजे ‘ढग’(could) हा विषय तिच्या चित्रांची मध्यवर्ती कल्पना म्हणून घेतलेला आहे. ढगांच्या आकारांनी सोनलला आकर्षित केलेले असून त्या त्या आकारांतून सोनलने कलाकृतींचे विषय चितारले आहेत. त्यांच्या कलाकृतीही ३ सप्टेंबरपर्यंत आर्टिस्ट सेंटरमध्ये पाहता येतील.

 

-प्रा. गजानन शेपाळ

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121