नाशिक : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची आज दि. २० जून २०१८ रोजी जिल्हा नियोजन बैठक, अभाविप कार्यालय, ऊमिया अपार्टमेंट, कॅनडा कॉनर, नाशिक येथे पार पडली. या बैठकीत कार्यक्रमाची विस्तृत योजना आणि विशेष योजनांची चर्चा करून मांडणी करण्यात आली. महाविद्यालय संपर्क अभियान, उद्दिष्टपूर्ती अभियान, विद्यार्थी दिन, गुरूपौर्णिमा, सेल्फी विथ कॅम्पस मोहीम, सदस्यता अभियान, प्रवास, प्रशिक्षणवर्ग, विद्यार्थिनीसाठी मिशन साहसी, तसेच आगामी दिशा ठरविण्यात आली. प्रदेश कार्यकारिणीत पारित झालेले प्रस्तावाचे वृत्त मांडण्यात आले तसेच जिल्हा समितीची घोषणा करण्यात आली. पुणे विभाग संघटनमंत्री सम्राट माळवदकर बैठकीस उपस्थित होते. जिल्हा समिती संयोजक म्हणून सागर शेलार यांची निवड करण्यात आली असून जिल्हा समिती सदस्य म्हणून शर्वरी अष्टपुत्रे प्रथमेश नाईक, दुर्गेश केंगे, राकेश साळुंके, नितीन पाटील, लक्ष्मण भोये, विलास ठाकरे, सोमनाथ ढिकले, सृष्टी चांडक, हर्षल ठाकरे, वैभव गुंजाळ, स्वप्नील बेगडे यांची निवड करण्यात आली तर जिल्हा अभ्यासवर्गप्रमुख म्हणून रोहीत डिडोळे तर जिल्हा सदस्यता प्रमुख म्हणून प्रथमेश नाईक दायित्व सांभाळणार आहेत.