सोशल मिडियाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधा - उमेश नेमाडे
भुसावळ, २७ मे
देशभरात पेट्रोल-डिझेलच्या कीमती वाढल्यामुळे सर्व सामान्य नागरिक मेटाकुुटीस आले आहे. सरकार दिशाभुल करीत आहे. भाजपा सरकारची लोकप्रियता कमी होत आहे.आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षांनी कार्यकारणीचा विस्तार करुन सोशल मिडियाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडविणे तसेच ओबीसी जातींच्या ३२० घटकांचा समावेश करुन घेण्यासंबंधी मार्गदर्शन राष्ट्वादी कॉंग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी तालुका पदाधिकार्यांना केले.
येथील सुरभि नगरात ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यानच्या कार्यालयात. २७ मे रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा राष्ट्रवासी ओबीसी विभागातर्फे बेैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी, ओबीसी घटकांतील १०वी,१२वी च्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणापत्र तात्काळ मिळण्यासाठी जात पळताळणी विभागाकडे रेटा लावणे. मागील वर्षी प्रमाणपत्र न मिळाल्याने हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासुन वंचित राहावे लागले आहे. सरकारने जनेतलला खोटे आश्वासने देवून फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री बेताल वक्तव्य करुन महाराष्ट्राच्या लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम करीत आहे. त्यांच्या या विधानांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जाहीर निषेध करित असू मुख्यमंत्र्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नसल्याने उमेश नेमाडे यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्र्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करीत आहे. ओबीसी हा मोठा घटक असुन. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सर्वप्रथम मंडल आयोगाची स्थानपना केली असल्याचे सांगितले.