
उत्तर प्रदेशात रेल्वेचा मेगाब्लॉक
चार एक्सप्रेस रेल्वे गाडया रद्द
भुसावळ, २७ मे
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद विभागातील दोन स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी तेथील रेल्वे विभागाने उदयापासुन २८ पासून मेगाब्लॉक घेतल्याने२ जुन पर्यंत भुसावळ विभागातुन धावणार्या चार रेल्वे गाड्यांच्या अप-डाऊन फेर्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत.
उत्तर मध्य रेल्वेच्या अलाहाबाद विभागातील जंघई, सरायगंज आणि सुरियावा स्थानकादरम्यान असलेल्या रेल्वे मार्गाच्या दुहेरी करणासाठी या मार्गावरच्या अनेक रेल्वे गाडया रद्द करण्यात आल्या आहेत़ यात भुसावळ विभागातुन धावणार्या गाडी क्र. ११०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस छपरा एक्सप्रेस २९ व ३१ मे रोजी तर ११०६० छपरा लोकमान्य टिळक टर्मिनस गोदान एक्सप्रेस २८ व ३१ मे आणि २ जुन रोजी, ११०५६ लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर गोदान एक्सप्रेस २९,३१ मे व १,३जुन रोजी तर ११०५५ गोरखपुर लोकमान्य टिळक टर्मिनस गोदान एक्सप्रेस २८, ३० मे व १ जुन रोजी रद्द करण्यात आली आहे़ ११०५४ आझमगड लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस १ जुन तर ११०५३ लोकमान्य टिळक टर्मिनस आझमगड एक्सप्रेस ३० मे रोजी रद्द करणयात आली आहे़ १५०१८ गोरखपुर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस २७ मे ते २ जुन पर्यंत तर १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर एक्सप्रेस २८ मे ते ४ जुन पर्यंत रद्द करण्यात आली आहे़ यामुळे अन्य प्रवाशी गाड्यांवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी वाढण्याची शक्यता आहे.