'त्या' होर्डिंग मागचे रहस्य उलगडले

    03-Dec-2018
Total Views | 19


 
 
 
मुंबई : पुण्यातील कर्वे रोडच्या टी पॉईंट येथे आणि मुंबईतील प्रभादेवी परिसरात काही दिवसांपूर्वी एक विचित्र होर्डिंग लागले होते. ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ असे या होर्डिंगवर लिहिले होते. या होर्डिंगबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. नेमके हे होर्डिंग कशासाठी लावले आहे? त्यातून काय व कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत अनेक तर्क लढवले जात होते. परंतु आता या होर्डिंगमागील कोडे अखेर उलगडले आहे.
 
 

 
 

एका नाटकाच्या प्रमोशनसाठी हे होर्डिंग लावण्यात आले होते. ‘दादा एक गुड न्यूज आहे’. असे या नाटकाचे नाव आहे. या नाटकाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या नाटकात अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री ह्रता दुर्गुळे हे प्रमुख भूमिकेत आहेत. या नाटकात हे दोघे बहीण-भावाची भूमिका साकारत आहेत. अभिनेता उमेश कामत या नाटकात साधे आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्यदक्ष आणि आपल्या बहीणवर जीवापाड प्रेम करणाऱ्या भावाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. ‘फुलपाखरु’फेम अभिनेत्री ह्रता दुर्गुळेचे हे पहिलेच व्यावसायिक नाटक आहे. कॉलेजला जाणारी, जीवन एन्जॉय करणारी आणि आपल्या भावावर जीवापाड प्रेम करणारी बहीण ह्रताने साकारली आहे.

 

 

 

अभिनेत्री प्रिया बापट हे नाटक रंगभूमीवर सादर करत आहे. काही दिवसांपूर्वी प्रिया बापटने पती उमेश कामत सोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यावर तिने ‘एक गुड न्यूज आहे.’ असे कॅप्शन लिहिले होते. त्यावरून प्रिया आणि उमेशच्या संसारात नवा पाहुणा येणार असल्याच्या चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये रंगल्या होत्या. अनेकांनी तिच्या या पोस्टवर दोघांना शुभेच्छाही दिल्या होत्या. परंतु याबाबतीतील सत्य समोर आल्यामुळे त्यांच्या शुभचिंतकांचा भ्रमनिरास झाला आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121