नवी दिल्ली : मंगळवारी सकाळी संसदेचे अधिवशेन सुरू होण्यापूर्वी संसंद भवनाबाहरील बॅरिकेडला एका टॅक्सीने धडक दिली. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे सुरक्षा जवान तात्काळ सतर्क झाले.
परिसरात अलर्ट जारी करण्यात आला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अचानक झालेल्या या प्रकारामुळे १७ वर्षांपूर्वी झालेल्या संसदेवरील हल्ल्यासारखीच परिस्थिती निर्माण होते की काय?, अशी धाकधूक सर्वांच्याच मनात निर्माण झाली होती. मात्र, खासदारांकडून वापरण्यात येणारी ही खासगी कार असल्याची लक्षात येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
या घटनेनंतर परिसरातील सर्व सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले. सीआरपीएफच्या क्विक अॅक्शन पथकाने संसदेच्या प्रवेशद्वाराला घेराव घातला. त्यानंतर काही जवानांनी कारची तपासणी केली. चौकशीत खासदार वापर करत असलेली ही खासगी कार असल्याची खात्री केल्यानंतर वातावरण शांत झाले. नंतर जारी करण्यात आलेला अॅलर्टही रद्द करण्यात आला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/