'म्हणून मी सिंदूर लावते’: स्मृती इराणी

    29-Nov-2018
Total Views | 36

 


 
 
 
मुंबई : भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांचे गोत्र काय? असा प्रश्न एका ट्विटर यूजरने स्मृती इराणी यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी स्मृती इराणी यांनी ट्विट केले. ट्विटर यूजरला असलेल्या शंकेचे निरसन तर स्मृती इराणी यांनी केलेच पण त्याचबरोबर पारसी असूनही त्या सिंदूर का लावतात? यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
 

माझे वडील हिंदू होते. त्यांचे गोत्र कौशल होते. त्यामुळे माझे गोत्रही कौशलच आहे. माझे पती पारसी आणि मुले आहेत. पारसी असल्याने त्यांना गोत्र नाही आहे. हिंदू धर्मावर माझी श्रद्धा आहे. म्हणून मी सिंदूर लावते. असे स्पष्टीकरण स्मृती इराणी यांनी दिले. त्यानंतर स्मृती इराणी यांनी अजून एक ट्विट केले. माझा धर्म हिंदुस्थान आहे. माझे कर्म हिंदुस्थान आहे. माझा विश्वास हिंदुस्थान आहे. माझी श्रद्धा हिंदुस्तान आहे.” असे त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121