रेल्वे नाट्योत्सवात मध्य रेल्वे मुंबईचे ‘दृष्टी’ प्रथम

    22-Nov-2018
Total Views | 28

पूर्वोत्तर सीमा रेल्वेचे ‘देवघर के अपने’ द्वितीय तर दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे ‘मुर्गीवाल’ तृतीय


 
भुसावळ
 
रेल्वे मंत्रालयाद्वारे क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थान भुसावळ येथे 18 ते 20 नोव्हेंबरदरम्यान अखिल रेल्वे हिंदी नाट्योत्सव 2018 आयोजित करण्यात आला होता. 20 रोजी मध्य रेल्वेचे अपर महाप्रबंध विशाल अग्रवाल यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यात मुंबई विभागाचे ‘दृष्टी’ हे नाटक प्रथम आले.
 
मंचावर अपर महाप्रबंधक विशाल अग्रवाल, मध्य रेल्वे विभागाचे मुख्य वीज अभियंता व राजभाषा अधिकारी एस.पी.वावरे, भुसावळ विभागाचे प्रबंधक आर.के.यादव, मनोज कुमार सिन्हा, प्रचार्य प्रदीप हिरडे उपस्थित होते.
 
याप्रसंगी अग्रवाल यांनी रेल्वे लोकांना जोडते तर हिंदी भाषा हृदयांना जोडते. भारतीय रेल्वेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी राजभाषा हिंदीच्या प्रचार आणि प्रसारात पुढे आहेत, असे मनोगतात सांगितले.
 
वावरे यांनी यानिमित्ताने हिंदीचे उत्साही वातावरण तयार झाले, असे सांगितले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नीरू पटनी यांनी केले. मध्य रेल्वेच्या ‘दृष्टी’ नाटकासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संतोष वेरुळकर, सर्वोत्कृष्ट अभिनेता जितेंद्र आगरकर, सर्वश्रेष्ठ अभिनेत्री आकांक्षा, सर्वोत्कृष्ट नेपथ्य विशाल शिंदे, सर्वोत्कृष्ट प्रकार परिकल्पना प्रशांत घुगरे यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
 
जळगाव येथील ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, नूपुर कत्थक नृत्य अकादमी भुसावळचे संचालक रमाकांत भालेराव, भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल डॉ. दिलीप देशमुख यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
 
या नाट्योत्सवात देशातील रेल्वेच्या विविध विभागांतील 16 नाटकांनी सहभाग घेतला होता. 8 उत्कृष्ट नाटके, 15 कलाकार यांना पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
वैयक्तिक बक्षिसे अशी -
 
सर्वश्रेष्ठ सहअभिनेता- हंसदेव शर्मा (पश्चिम रेल्वे नमक का दरोगा), सर्वश्रेष्ठ सहअभिनेत्री मीरा सिद्धार्थ व सर्वोत्तम लिखाण -आसिफ (पूर्वोत्तर रेल्वे, मैमूद नाटक), सर्वोत्कृष्ट संगीत- देवकुमार राव व सर्वोत्कृष्ट रुपरेषा- ज्योतीषचंद्र (पूर्वोत्तर सीमा रेल्वे, देवधर के अपने), सर्वोत्कृष्ट ध्वनी प्रभाव - ज्ञानेश पेंढारकर (पश्चिम रेल्वे , नमक का दरोगा), सर्वोत्कृष्ट वेशभूषा -नीरज उपाध्याय (वाराणसी, महाभारत नही), सर्वोत्कृष्ट संवाद - (दक्षिण पश्चिम रेल्वेचे ‘समुद्र के उसपार’मधील सर्व कलाकार), सर्वश्रेष्ठ बाल कलाकार- आदिजा बंदोपाध्याय (शहीद की माँ, मेट्रो रेल्वे कोलकाता), सर्वश्रेष्ठ विशिष्ट अभिनय पुरस्कार - स्माईली ठाकूर, (नारी, उत्तर रेल्वे, फिरोजपूर)
या पाच नाटकांना बक्षिसे
 
प्रथम पुरस्कार मध्य रेल्वे मुंबई विभागाचे ‘दृष्टी’ या नाटकास तर द्वितीय पूर्वोत्तर सीमा रेल्वेचे ‘देवघर के अपने’ आणि तृतीय पुरस्कार दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे ‘मुर्गीवाल’ या नाटकास मिळाले.
 
उत्तेजनार्थ प्रथम पुरस्कार पूर्वोत्तर रेल्वे, उत्तेजनार्थ द्वितीय उत्तर रेल्वे फिरोजपूर विभाग ‘नारी’ या नाटकास, तृतीय चित्तरंजन रोड कारखाना, ‘चित्तरंजनचे जनक’ या नाटकास, चतुर्थ पश्चिम रेल्वेचे ‘नमक का दरोगा’ नाटकास आणि पाचवे उत्तेजनार्थ पुरस्कार डिझेल रेल्वे इंजीन कारखाना पटियालाच्या ‘आषाढ का एक दिन’ या नाटकाला देण्यात आले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121