जागतिक बँकेचा अहवाल; मोदी सरकारची दमदार कामगिरी

    01-Nov-2018
Total Views | 171



मागील चार वर्षात व्यवसाय सुलभता क्रमावरीत तब्बल ६५ स्थानांची सुधारणा


मुंबई : जागतिक बँकेने जाहीर केलेल्या व्यवसाय सुलभता (ईझ ऑफ डुईंग बिझनेस) अहवालानुसार भारतात व्यवसाय करणे अधिक सोप्पे झाले आहे. जागतिक बँकेच्या या अहवालानुसार भारताच्या क्रमवारीमध्ये ऐतिहासिक सुधारणा होत २३ स्थानांची सुधारणा झाली. या अहवालानुसार भारताने आजवरचे सर्वोच्च असे ७७ वे स्थान गाठले आहे. २०१७ साली भारत या यादीत १०० व्या स्थानावर होता.

 

२०१४ मध्ये भारत जागतिक व्यवसाय सुलभतेमध्ये १४२ व्या स्थानी होता. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भारताच्या व्यवसाय सुलभता क्रमावरीत तब्बल ६५ स्थानांची सुधारणा झाली आहे. जागतिक बँकेच्या या यादीसाठी दिल्ली आणि मुंबई या दोन औद्योगिक शहरांचा विचार करण्यात आला. दरम्यान, व्यवसाय सुलभतेच्या या क्रमवारीसाठी वीज, कर्जाची व्यवस्था, बांधकाम परवानग्या, कररचना आदी निकष लक्षात घेतले जातात.

 

जागतिक बँकेच्या या अहवालानुसार भारत हा एकमेव देश आहे ज्याने एवढीमोठ्या स्थानांची झेप घेतली. जागतिक बँकेच्या या यादीनुसार भारताने वीजपुरवठा, बांधकाम परवाना, उद्योग पायाभरणी, पतपुरवठा, विदेशी व्यापार आणि कंत्राट अंमलबजावणीमध्ये सुधारणा केली आहे. तर दिवाळखोरी, करभरणा, लघु गुंतवणूकदारांची सुरक्षा, मालमत्ता नोंदणी अशा आदी क्षेत्रातील कामगिरी घसरली आहे.

 

भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे तसेच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली व केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, "ही कामगिरी प्रधानमंत्री मोदी यांच्या कठोर मेहनतीचे फळ असून ही झेप म्हणजे जागतिक पटलावर भारताने नोंदवलेला मोठा विक्रम आहे"

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121