पाच मिनिटांत चार लाख कोटींचा चुराडा

    11-Oct-2018
Total Views | 27
 
 

सेन्सेक्स ७५९ तर निफ्टी २२५ अंकांनी घसरला

 

मुंबई : रुपयाचा नवा विक्रमी तळ आंतरराष्ट्रीय शेअर बाजार गडगडल्याचे पडसाद गुरुवारी शेअर बाजारावर उमटले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १ हजार ३७.३६ अंकांनी घसराला. तर निफ्टी ३२१.५ अंकांनी घसरल्याने केवळ पाच मिनिटांत गुंतवणूकदारांच्या चार लाख कोटींचा चुराडा झाला. मुंबई शेअर बाजाराचे मुंबई शेअर बाजाराचे भाग भांडवल हे बुधवारी १,३८,३९,७५० कोटी होते. बाजार सुरू झाल्यानंतर ते १,३४,३१,३७४ कोटींवर घसरले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७०२.७५ अंकांनी घसरुन ३४ हजार ५८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२५.४५ अंकांनी घसरुन १० हजार २३५ अंकांवर बंद झाला. निफ्टीमध्ये केवळ चार शेअरमध्ये खरेदी दिसून आली तर सेन्सेक्समध्ये एक्सिस बॅंक ४.९१ टक्के, वेदांता ४.१५ टक्के एसबीआय ४.०५ टक्के, टाटा स्टील ३.६३ टक्के, भारती एअरटेल ३.३७ टक्के, मारुति ३.१८ टक्के आयसीआयसीआय बॅंक ३.१५ टक्के आणि रिलायन्स ३.१३ टक्के घसरले. इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सचा शेअर ९ टक्क्यांनी घसरला. सेन्सेक्सवरील सर्व शेअर घसरणीसह बंद झाले. आशियाई आणि अमेरिकन शेअर बाजारात गुरुवारी झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर उमटला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बॅंकेच्या वाढीव व्याजदरांचा फटका अमेरिकन बाजाराला बसला. डाऊ जोंस ८३२ अंकांनी घसरला तर नॅसडॅक ३१६ अंकांनी घसरुन बंद झाला. आशियाई शेअर बाजाराच्या निर्देशांकांपैकी जपानचा निक्केई ९१५ अंकांनी घसरून २२ हजार ५९१ वर बंद झाला. तर हॉंगकॉंगचा हॅंग सेंग ९९० अंकांनी घसरला. सिंगापूरचा एसजीएक्स २६७ अंकांनी घसरुन १० हजार २१३ अंकांवर बंद झाला.

 

तेल कंपन्यांचे शेअर वधारले : आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढत्या किमती आणि पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर याचा फायदा तेल कंपन्यांना होणार असल्याने तेल कंपन्यांचे शेअर वधारले. इंडियन ऑईलचा शेअर पाच टक्क्यांनी वाढून १३१.१५ अंकांवर बंद झाला. एचपीसीएलचा शेअर १६ टक्क्यांनी वधारत २१० रुपयांवर पोहोचला. बीपीसीएलचा शेअर ४ टक्क्यांनी वाढून २७८.२५ वर पोहोचला. गेल इंडियाचा शेअर ४ टक्क्यांनी वधारत ३५० रुपयांवर पोहोचला.

 

रुपयाचा नवा तळ : गुरुवारी रुपयाने नवा तळ गाठल्याने त्याचाही पडसाद बाजारावर उमटत गेला. रुपया २७ पैशांनी घसरुन ७४.४८ प्रतिडॉलरवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढते भाव आणि परकीय गुंतवणूकदारांची निराशा काहीकाळ अशीच स्थिती राहिल असा अंदाज जाणकारांतर्फे व्यक्त केला जात आहे.

 

परकीय गुंतवणूकदारांचा काढता पाय : जगभरातील शेअरबाजाराच्या पडझडीची धास्ती घेत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून काढता पाय घेतला आहे. सप्टेंबरमध्ये १० हजार ८२४ कोटी तर ऑक्टोबरमध्ये पहिल्या दहा दिवसांत १४ हजार ९७ कोटी रुपये परकीय गुंतवणूकदारांनी काढून घेतले आहेत.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 



अग्रलेख
जरुर वाचा
पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121