देवेंद्र फडणवीस
Read More
महाराष्ट्रात राजकीय पक्षाचे मेळावे जोरात घेतले जात आहेत. सत्तारूढ पक्षाचे मोर्चेही मोठ्या गर्दीत होत आहेत. मग शिवजयंतीवरच निर्बंध का आणले? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत, रयतेच्या राज्यात मोगलाई आली असल्याची टीका त्यांनी केली.
पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी करावी. प्रकरण दाबू नये. या प्रकरणात संशयाचे वर्तुळ तयार झाले आहे, असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात सत्ताधारी शिवसेना व काँग्रेस आंदोलनाच्या भूमिकेत आली आहे. यासंदर्भात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमधील पक्षांवर टीका करत, मोर्चे काढण्याची नौटंकी व मोर्चे न करता, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा असं म्हणत शिवसेना काँग्रेसवर टीका केली आहे.
आत्मनिर्भर पॅकेजच्या माध्यमातून कोविडच्या संकटकाळात अनेक पॅकेज जाहीर केलेले असताना सुद्धा आज केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प कोरोना संकटाला संधीत परावर्तित करतानाच देश आणि देशातील नागरिकांच्या आकांक्षांना नवउभारी देण्याचा संकल्प आणखी दृढ करणारा आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.