(Shubhanshu Shukla) 'ॲक्सिओम-४' या मिशनअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे १५ जुलै रोजी पृथ्वीवर परतणार आहेत दरम्यान परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी शुभांशू यांनी या एक संदेश दिला आहे. "हा एक अविश्वसनीय प्रवास होता. या मिशनमध्ये सहभागी असलेल्या लोकांमुळे तो अद्भुत आणि अविश्वसनीय होऊ शकला," असे शुभांशू त्यांच्या निरोपाच्या भाषणात म्हणाले.
Read More
अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ आणि भारतीय अंतराळ संस्था ‘इस्रो’च्या सहकार्यातून नुकतेच ‘अॅक्सिओम मिशन 4’ साठी यशस्वी उड्डाण झाले. या मोहिमेत शुंभाशू शुक्ला हे भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अमेरिकन अंतराळवीरांसोबत संशोधन करणार आहेत. तेव्हा, यानिमित्ताने भारत-अमेरिका अंतराळ सहकार्याच्या या नवीन अध्यायाविषयी...
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लासह चार अंतराळवीर आज दि. २६ जून रोजी सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचतील. याआधी त्यांनी अंतराळातून लाइव्ह येत त्यांचा आतापर्यंतचा अनुभव सांगितला आहे. अॅक्सियम मिशन ४ अंतर्गत बुधावर दि. २५ जून रोजी चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने रवाना झाले. तांत्रिक अडचणींमुळे हे मिशन यापूर्वी सहा वेळा पुढे ढकलण्यात आले होते. काल अखेर या यानाचे यशस्वीपणे प्रक्षेपण पार पडले.
(Axiom-4 Mission) भारताच्या अंतराळ प्रवासातील आजचा दिवस अविस्मरणीय ठरला आहे. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि इस्रोचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला (Shubhanshu Shukla) यांनी २५ जून रोजी दुपारी १२ वाजता यशस्वीरित्या अवकाशात झेप घेत नवा इतिहास रचला आहे. Axiom-4 या खासगी अंतराळ मोहिमेअंतर्गत ते चार सदस्यीय अंतराळवीर पथकासोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजेच आयएसएसकडे रवाना झाले आहेत. ४१ वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी केलेल्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासानंतर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय अंतराळ
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. १४ जानेवारी रोजी डॉ. व्ही. नारायणन (Dr. V. Narayanan) इस्रोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी करत माहिती देण्यात आली आहे. डॉ. व्ही. नारायणन यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत इस्रोमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. डॉ. नारायणन यांचे वैशिष्ट्य रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शनमध्ये आहे.
भारताची विजयपताका उंचावणारा अजून एक सन्मान भारताच्या सुपुत्राला प्रदान करण्यात आला आहे. इस्रोचे सचिव एस सोमनाथ यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाने पुरस्कार देऊन गौरव करण्यात केला आहे. चांद्रयान ३ या मोहीमेच्या यशासाठी हा पुरस्कार देण्यात आला असून, भारताच्या अंतराळ मोहिमांचे जगभरात कौतुक होत आहे.
(Elon musk) स्पेस एक्सचे पोलारिस डॉन क्रू रविवार, दि. १५ सप्टेंबर रोजी पृथ्वीवर परतले. ड्रॅगन स्पेसक्राफ्ट फ्लोरिडाच्या ड्राय टॉर्टुगास कोस्टवर दुपारी १.०६ वाजता उतरले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना अंतराळयानाचा वेग ताशी २७ हजार किमी होता. हवेशी संपर्क झाल्याने घर्षण निर्माण झाले आणि तापमान १ हजार, ९०० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) चे क्रू मेंबर्स लवकरच बदलणार आहेत.
घराजवळील एका चर्चासत्रामधून प्रेरणा घेत, अंतराळविश्वाचे वेड लागलेल्या ठाणेकर युवा शास्त्रज्ञ अक्षत मोहिते याच्या अंतराळ संशोधनाची दखल ‘नासा’ने घेतली आहे. त्याच्या या ‘अक्षत’ भरारीविषयी...
गागारिन हा तरबेज वैमानिकच नव्हे, तर अनुभवी अंतराळवीर होता. एखाद्या नवशिक्या वैमानिकाप्रमाणे त्याने वेदर बलून किंवा ढगावर विमान ठोकलं, हे कुणाला पटणार?
दीर्घकालीन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा रोडमॅप
एकंदरीत विश्वाच्या या अफाट पसार्यात पृथ्वीवरचा मानव ‘अकेला नही है’ असे म्हणता येईल. पण, ‘हम भी तेरे हमसफर है’ असे म्हणणारे ते परग्रहवासी लेकाचे समोर येत नाहीत.
द्रावर पहिले पाऊल ठेवणारा मानव म्हणून जसा नील आर्मस्ट्राँगने इतिहास रचला तसाच इतिहास आता एका महिलेच्या नावे रचला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, अशी माहिती ‘नासा’ संस्थेचे प्रशासक जिम ब्रायडेनस्टीन यांनी दिली. त्यामुळे एकेकाळी केवळ चूल आणि मूल सांभाळणारी ‘ती’ आता मंगळावर झेप घेईल.