...तू अकेला ही नही है

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

vv1_1  H x W: 0


एकंदरीत विश्वाच्या या अफाट पसार्‍यात पृथ्वीवरचा मानव ‘अकेला नही है’ असे म्हणता येईल. पण, ‘हम भी तेरे हमसफर है’ असे म्हणणारे ते परग्रहवासी लेकाचे समोर येत नाहीत.



हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात शैलेंद्र हा एक अलौकिक प्रतिभेचा कवी होऊन गेला
. १९५६ साली पडद्यावर आलेल्या राज कपूरच्या ‘श्री ४२०’ या चित्रपटासाठी त्याने एक गीत लिहिलं- ‘जिंदगानी के सफर में, तू अकेला ही नही है, हम भी तेरे हमसफर है, मुडमुड के ना देख मुडमुडके.”


आज हेलन शेरमन ही ब्रिटिश अंतराळवीर महिला अवघ्या मानवजातीला तेच सांगते आहे
. मात्र, ‘वळून पाहू नका’ असा तिच्या सांगण्याचा मथितार्थ नसून उलट, ‘नीट डोळे उघडून पाहा. समजून घेण्याचा, आकलन करण्याचा प्रयत्न करा,’ असा तिच्या म्हणण्याचा आशय आहे. हेलन शेरमन म्हणते की, “पृथ्वीखेरीज अन्यत्र प्रगत जीवसृष्टी नक्कीच आहे. इतकंच नव्हे, तर ते परग्रहवासी प्रगत जीव नक्कीच पृथ्वीवर आलेले आहेत, पण आपल्याला त्यांचं अस्तित्व समजत नाही. कारण, आपलं मानवी शरीर ज्याप्रमाणे कार्बन आणि नायट्रोजन यांचं बनलेलं आहे, तसं त्यांचं असेलच असं नाही.”


हेलन शेरमन ही कुणी देव देव करीत फिरणारी चर्चमधली जोगीण
(पक्षी : नन्) नव्हे की लठ्ठ पगारवाल्या नवर्‍याची वेळ घालवण्यासाठी ललित साहित्य प्रसवणारी बायकोही नाही. ती वैज्ञानिक आहे. तिने ‘रसायनशास्त्र’ या विषयात लंडनच्या बरबेक कॉलेजातून ‘डॉक्टरेट’ मिळवलेली आहे. १९९१ साली ब्रिटन आणि तत्कालीन सोव्हिएत रशिया यांच्या एका संयुक्त अवकाश संशोधन मोहिमेत तिची निवड झाली. रशियाच्या ‘सोयूझ-१२’ या अंतराळयानातून दोन रशियन पुरुष सहकार्‍यांबरोबर तिने अवकाशात झेप घेतली. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी २९६ किमी. ते ४१५ किमी. एवढ्या उंचीवर भ्रमण करणार्‍या रशियाच्या ‘मीर’ या अवकाश स्थानकावर ते पृथ्वीच्या कालमापनानुसार दोन दिवसांत पोहोचले. (१८ मे ते २० मे, १९९१) तिथल्या आठ दिवसांच्या वास्तव्यात हेलनने तिच्यावर सोपविण्यात आलेले काही शास्त्रीय प्रयोग म्हणजे वैद्यकशास्त्र आणि कृषीविज्ञान यासंबंधीची काही निरीक्षणं केली. पुन्हा दोन दिवसांचा प्रवास करून ती आणि तिचे सहकारी २६ मे, १९९१ रोजी पृथ्वीवर परतले. सध्या ती इंपीरियल कॉलेज, लंडन इथे रसायनशास्त्र हाच विषय शिकवते.


दि
. १६ जुलै १९६९ या दिवशी अमेरिकेचं ‘अपोलो-११’ हे अंतराळयान चंद्रावर उतरलं, हे आपल्याला माहीतच आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव म्हणून नील आर्मस्ट्राँग याचं नाव अख्ख्या जगाला आजही माहीत आहे. २०१९च्या जुलै महिन्यात या घटनेची अर्धशताब्दीही साजरी करण्यात आली होती. नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन हे दोघे अंतराळवीर चंद्राच्या भूमीवर उतरले, त्यावेळी त्यांचा तिसरा सहकारी मायकेल कोलिन्स हा चांद्रयानातच थांबलेला होता. त्याच्यावरची जबाबदारी जास्त मोठी होती. चंद्राच्या अज्ञात पृष्ठभागावर उतरलेले आपले दोघे सहकारी मित्र सुखरूप परत येतील, याची काळजी त्याला घ्यायची होती. आज मायकेन कोलिन्स ८९ वर्षांचा आहे. विश्वात पृथ्वीव्यतिरिक्त अन्यत्रसुद्धा जीवसृष्टी आहे, या गोष्टीवर त्याचाही पूर्ण विश्वास आहे.


जगभरात जेवढ्या म्हणून प्राचीन संस्कृती आणि त्यांचं साहित्य उपलब्ध आहे
, त्या सर्वातच पृथ्वीबाहेरील जीवांचे उल्लेख आढळतात. त्या उल्लेखांनुसार हे जीव पृथ्वीवरील मानवांपेक्षा कित्येक पट अधिक प्रगत आणि म्हणून अधिक शक्तीशालीही असतात. पुराणकथा हे ललित साहित्य म्हणून बाजूला ठेवलं, तरी ज्यांना ‘आधुनिक वैज्ञानिक’ म्हणता येईल, अशांनीही असे उल्लेख केले आहेत. उदा. जोहान्स केपलर.


सोळाव्या आणि सतराव्या शतकात युरोपात विज्ञान विषयात जी क्रांती झाली
, तिच्यात जोहान्स केपलर हे एक मोठं नाव आहे. सन १५७१ ते १६३० हा याचा काळ आहे. तो खगोलशास्त्र होता, ज्योतिषी होता, गणितज्ज्ञ होता आणि तत्त्वज्ञही होता. निकोलस कोपर्निकस आणि टायको ब्राही या महान खगोलवेत्त्यांचं काम त्याने पुढे नेलं. आपल्या सूर्यमालेतले ग्रह कोणत्या रीतीने भ्रमण करतात, हे त्याने शोधून काढलं. आजही तो सिद्धांत ‘केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन’ म्हणून ओळखला जातो. केपलरचं काम सर आयझॅक न्यूटनने पुढे नेलं, तर अशा या केपलरने सन १६०९ साली लिहिलेल्या आपल्या पुस्तकात पृथ्वीबाहेरील सजीवांचा उल्लेख केला आहे. अर्थात ते पुस्तक शास्त्रीय नसून ललित साहित्यच होतं. पण केपलरसारख्या शास्त्रज्ञाला असा उल्लेख करावासा वाटला, हे महत्त्वाचं.


काळोख्या रात्री आकाशात दिसणारा दुधाळ रंगाचा पट्टा
, जिला आपण ‘आकाशगंगा’ म्हणतो, तिच्याबद्दल प्राचीन काळापासून अनेक तत्त्वज्ञ आणि निरीक्षक यांनी अनेकविध मतं नोंदवलेली आहेत. पण, तिच्याबद्दल आणखी स्पष्ट निरीक्षण व्हायला सन १६१० साल उजाडावं लागलं, कारण सुप्रसिद्घ शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली याने प्रथम दुर्बिणीचा शोध लावला आणि १६१० साली दुर्बिणीतून आकाशगंगेची निरीक्षणं करून ती नोंदवून ठेवली. खगोलविज्ञान पुढे पुढे जाऊ लागलं आणि तरीही पुढची तीनशे वर्षं शास्त्रज्ञांना असं वाटत होतं की, आपली आकाशगंगा म्हणजेच संपूर्ण विश्व आणि आपला सूर्य नि त्याची ग्रहमाला हेच आकाशगंगेतले प्रमुख ग्रह-तारे. मग १९२० साली हार्लो शेपले, हेबर कर्टिस आणि एडविन हबल या तीन महान खगोलशास्त्रज्ञांमध्ये खूप चर्चा झाली. तिला ‘द गे्रट डिबेट’ याच नावाने ओळखलं जातं. त्या चर्चेचं सार हे की, आपल्या आकाशगंगेत आपला सूर्य हा केंद्रस्थानी नाही. सूर्यासारखेच स्वयंप्रकाशित आणि स्थिर असे ‘तारे’ किमान ४०० दशकोटी आहेत आणि भ्रमण करणारे ‘ग्रह’ किमान १०० दशकोटी आहेत. म्हणजेच आपला सूर्य हा अगदीच ‘बिचारा’ या कोटीतला आहे आणि अशा या आपल्या आकाशगंगेसारख्या आणखी कित्येक आकाशगंगा या विश्वात आहेत.


आता यापाठोपाठच दुसरा विचार पुढे आला की
, जर असं आहे तर सजीव सृष्टी फक्त पृथ्वीवरच का असावी? ती अन्यत्रही असावी. प्राचीन पुराणकथांमधून तर सरळच असं म्हटलं जात होतं की, पृथ्वीवरचा पुरुष हा मंगळावरून आलेला आहे नि स्त्री ही शुक्रावरून आलेली आहे. या विचारातून शास्त्रज्ञ मंडळी अशा संशोधनाला लागली की, पृथ्वीबाहेरील अन्य कोणत्या ग्रहांवर असं वातावरण आहे की, जिथे जीवसृष्टीला पोषक अशी द्रव्यं आहेत? मंगळासह गुरू ग्रहाचे ‘गनिमीड’ आणि ‘कॅलिस्टो’ हे चंद्र तसंच शनि ग्रहाचे ‘टिटान’ आणि ‘एन्सिलेडस’ नावाचे चंद्र यांच्यावर तशी पोषक द्रव्ये आहेत, असं त्यांना वाटतं आहे. कार्ल सगान सारखा अलीकडच्या काळातला नामवंत शास्त्रज्ञही या संशोधनात सहभागी होता.


त्यातच भर पडली उडत्या तबकड्यांची
. १९४० च्या दशकात अनेक लोकांनी, यात सामान्य माणसांपासून वैमानिकांपर्यंत सगळे होते. आकाशात अज्ञात वस्तू उडताना पाहिल्या. बरेचदा त्या पसरट बशीच्या आकाराच्या होत्या. त्यावरून सामान्य भाषेत त्यांना ‘फ्लायिंग सॉसर’ किंवा ‘उडती तबकडी’ असं म्हटलं गेलं. शास्त्रज्ञांनी मात्र त्यांना ‘अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट’ उर्फ ‘युएफओ’ या नावाने संबोधलं. याविषयी कसून संशोधन करण्यात आलं, असा सिद्धांत मांडण्यात आला की, या उडत्या तबकड्या म्हणजे परग्रहावरील अतिप्रगत सजीवांची अवकाशयाने होती.


मात्र
, अजूनही कोणालाही परग्रहांवर सजीव सृष्टी आहे किंवा असा एखादा सजीव पृथ्वीवर येऊन गेला, असा पक्का वैज्ञानिक पुरावा हडसून खडसून सिद्ध करता आलेला नाही. संशोधनांचे तपशील निष्कर्ष त्या दिशेने निर्देश करतात, हेही नक्की.


परंतु
, परग्रहावरील सजीव किंवा उडत्या तबकड्या यांवरून अक्षरक्षः डोंगराएवढ्या कथा-कादंबर्‍या चित्रपट नि दूरदर्शन मालिका जगभरच्या सर्व भाषांमध्ये निघाल्या आहेत आणि आजही निघत आहेत. या संदर्भात अलीकडचा प्रसिद्ध लेखक म्हणजे एरिक फॉन डॅनिकेन हा स्विस कादंबरीकार वैज्ञानिकांनी त्याच्या पुस्तकांना ‘सायन्स फिक्शन’ म्हणजे ‘विज्ञान काल्पनिका’ ठरवलं आहे, पण त्याचं म्हणणं असं की, आपण ज्यांना देव समजतो, ते प्रत्यक्षात परग्रहावरचे अतिप्रगत सजीव होते. इजिप्तचे पिरॅमिडस्, दिल्लीचा न गंजणारा लोहस्तंभ इत्यादी अत्याधुनिक अभियांत्रिकीलाही थक्क करणारी बांधकामं आपण म्हणजे पृथ्वीवरील मानवांनी केलेलीच नाहीत. ती या ‘देव’ नामक परग्रहवासी अतिप्रगत मानवांनी केलेली आहेत.


एकंदरीत विश्वाच्या या अफाट पसार्‍यात पृथ्वीवरचा मानव
‘अकेला नही है’ असे म्हणता येईल. पण, ‘हम भी तेरे हमसफर है’ असे म्हणणारे ते परग्रहवासी लेकाचे समोर येत नाहीत. या संदर्भात आणखी एक सिद्धांत मांडला जातो की, आपण मानव त्रिमिती जगात जगतो. म्हणजे आपले डोळे त्रिमिती- थ्री डायमेन्शनल वस्तूच पाहू शकतात, पण विश्वात आणखी असंख्य मिती, डायमेन्शन्स आहेत. हे परग्रहवासी त्या त्रिमिती पलीकडच्या मितीत असतात. म्हणून ते आपल्याला दिसत नाहीत.


तर हेलन शेरमन म्हणते तसं
समजून घेण्याचा प्रयत्न करा, जाणीव, संवेदना आणखी तल्लख करा, आकलन वाढवा.”

@@AUTHORINFO_V1@@