चांद्रयान ३ चा जागतिक सन्मान! सातासमुद्रापार इस्रोचे कौतुक
एस सोमनाथ यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाकडून गौरव
19-Oct-2024
Total Views |
रोम : भारताची विजयपताका उंचावणारा अजून एक सन्मान भारताच्या सुपुत्राला प्रदान करण्यात आला आहे. इस्रोचे सचिव एस सोमनाथ यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाने पुरस्कार देऊन गौरव करण्यात केला आहे. चांद्रयान ३ या मोहीमेच्या यशासाठी हा पुरस्कार देण्यात आला असून, भारताच्या अंतराळ मोहिमांचे जगभरात कौतुक होत आहे.
आयएएफ वर्ल्ड स्पेस अवॉर्ड हा सोहळा १४ ऑक्टोबर रोजी इटलीतील मिलान या शहरात पार पडला. जगभरातील ७७ देश, या आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघात सामील आहे. जगभरातील अंतराळवीरांना, वैज्ञानिकांना एकत्र जोडण्याचे काम ही संस्था करते. दरवर्षी, या संस्थेकडून आयएएफ वर्ल्ड स्पेस अवॉर्ड हा सन्मान देण्यात येतो. या वर्षी अंतराळ क्षेत्रात भारताने केलेल्या कामगीरी साठी एस सोमनाथ यांचा सन्मान करण्यात आला आहे.
चांद्रयान ३ चे जगभरात कौतुक
आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाने चांद्रयान ३च्या कामगीरी बद्दल इस्रोचे कौतुक केले आहे. पुरस्कार प्रदान करताना आयएएफनी म्हटले की, चांद्रयान ३ ही मोहीम वैज्ञानिकता आणि बचतीचा अनोखा संगम आहे. या मोहीमेमुळे भारताची अवकाश संशोधना संदर्भात असलेली वचनबद्धता दिसून येते. २०२३ साली जेव्हा अखेर दक्षिण ध्रुवावर चांद्रयानचे सॉफ्ट लँडींग झाले, तेव्हा इस्रोच्या कार्यतक्षमतेचे आणि तिथल्या वैज्ञानिकांच्या प्रतिभेचे जगभरात कौतुक झाले. भारताची ही कामगीरी म्हणजे मैलाचा दगड असून चांद्रयान ३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारे पहिले यान ठरले आहे. यावरुन भारताचे तांत्रिक सामर्थ्य अधोरेखित होते असे तज्ञांनी म्हटले. आयएएफ वर्ल्ड स्पेस अवॉर्ड हा अंतराळ क्षेत्रातील प्रतिष्ठीत सन्मान असून या पूर्वी एलोन मस्क या प्रसिद्द स्पेस Xच्या संस्थापकाला हा सन्मान प्रदान करण्यात आला होता.