टेलिकॉम क्षेत्रातील नवीन माहिती पुढे आली आहे. या माहितीत म्हटल्याप्रमाणे, एकाहून अधिक टेलिकॉम कनेक्शन असल्यास अतिरिक्त फी आकारली जाईल ही केवळ अफवा असल्याचे ट्राय (Telecom Regulatory Authority of India) ने स्पष्ट केले आहे. ही केवळ अफवा असून असा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या विषयावर ट्रायने 'Numbering Plan' या विषयी लागू करावे का यासाठी प्रतिक्रिया मागवल्या होत्या.
Read More
५ जी स्पेक्ट्रम लिलावाची तारीख बदलण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जी स्पेक्ट्रम सुरूवातीला २० मे रोजी होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DoT) ने सोमवारी Notice Inviting Applications (NIA) ने आपल्या नोटीशीत बदल केला आहे.
आता टेलिकॉम विभागाने टेलिकॉम कंपन्यांना बनावट कॉल रोखण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन या सरकारी विभागाने टेलिकॉम ऑपरेटर अथवा टेलिकॉम सर्विस प्रोवायड (TSP) यांना आंतरराष्ट्रीय बनावट कॉल ग्राहकांना येऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. त्यामुळे याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी करावी लागेल.
डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DoT) ने बीएसएनएल (BSNL), एमटीएनएल (MTNL) या दोन सरकारी टेलिकॉम कंपनीच्या अधिकच्या मोकळ्या जागा विकण्याचे ठरवले आहे. यासाठी सरकार या जागांचा लिलाव करू शकते. सरकारने एमटीएनएलचा एकूण १०० जागा व बीएसएनएलच्या जागा विक्रीसाठी काढणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
सरकारने सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी मोठी मोहिम उघडली आहे त्याच प्रत्यय गेल्या काही दिवसांपासून येत आहे. अशीच मोठी कारवाई करत सरकारने टेलिकॉम कंपन्यांना सायबर क्राईममध्ये वापरले गेलेले मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्यास सांगितले आहे.याशिवाय कुठल्याही सायबर क्राईम अथवा यांच्याशी संबंधित असलेल्या मोबाईल नंबरवर बंदी घालण्यास सरकारने सांगितले आहे .
बुधवारी नीरज मित्तल यांची Department of Telecommunications ( DOT) च्या सेक्रेटरी पदी निवड झाल्याचे वृत्त मिडियाने दिले आहे. नीरज मित्तल १९९२ बॅचचे ( Indian Administrative Officer) आहेत. यापूर्वी के. राजारामन हे DOT चे सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. मित्तल यांच्यापुढे OTT नियमन, टेलिकॉमचे नवीन बीलचे धोरण, Satellite, व टेलिकम्युनिकेशनची नवीन धोरणे अशी नवीन आव्हाने त्यांच्यासमोर आहेत.
अरब देशांमध्ये चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि भारत या चार देशांच्या नेतृत्वातून लवकरच रेल्वे नेटवर्कद्वारे आखाती देशांना जोडणारा नवा प्रकल्प जगासमोर येणार आहे. ’ब्लू डॉट नेटवर्क’ या नावाने ओळखल्या जाणार्या या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गेल्या रविवारी अमेरिका, सौदी अरेबिया आणि युएईच्या सुरक्षा सल्लागारांची भेट घेतली. यावेळी आखाती देशांना अरब देशांशी
वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी एक इमोशनल फिटनेस ट्रेनर संकेतस्थळ काढणाऱ्या रिचा सिंगचा ‘आयआयटी ते फॉर्ब्स’पर्यंतचा विलक्षण प्रवास...