( Mumbai Metro 3 preferred by Mumbaikars ) मुंबई मेट्रो ३च्या २ अ 'आचार्य अत्रे चौक ते आरे जेव्हीएलआर' या मार्गाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती नुकतेच करण्यात आले. 'आम्हाला जो प्रवास करण्यासाठी पूर्वी ४५० ते ५०० रुपये आणि दीड ते दोन तासांचा कालावधी लागत होता तो प्रवास आता केवळ ६० रुपयांत आणि ३० मिनिटांत पूर्ण होतोय', अशी भावना मुंबई मेट्रो ३ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली.
Read More
( Metro 3 & mumbai BEST connectivity ) मुंबई मेट्रो-३ कुलाबा-बीकेसी-आरेच्या दुसऱ्या टप्प्याची सेवा लवकरच सुरू होणार असून, या मार्गाला अंतिम टप्प्यापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट(बेस्ट)ने ३२ बस मार्गांचे सुसूत्रीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
(Aaditya Thackeray) सरकारी योजना, सरकारचे प्रकल्प यांना आधी विरोध करुन आडकाठी निर्माण करायची आणि नंतर त्याच सरकारच्या योजनांची नाव घेत मतं मागायची, त्याच सरकारी प्रकल्पातून निर्माण झलेल्या सोईसुविधांचा लाभ घ्यायचा, हे काही उद्धव ठाकरेंसाठी नवीन नाही. परंतु आता आदित्य ठाकरेंनीही आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत पूर्वी ज्या मेट्रो प्रकल्पाला सातत्याने विरोध केला त्याच मेट्रोने प्रवास करुन त्यांच्या दुटप्पीपणाचे दर्शन घडवले.
मेट्रो ३ कारशेड आणि १९ बंगला प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गिरे तो भी टांग उपर अशी उध्दव ठाकरेंची स्थिती असल्याचे म्हणटले आहे. ठाकरे परिवार मुंबई मेट्रो रुळावरून खाली आणण्याचा प्रयत्न करत आहे. मेट्रो 3 कारशेड चा मार्ग न्यायालयाने मोकळा केला आहे. असे ही सोमय्या म्हणाले.
आरेप्रकरणी मेट्रो कारशेडच्या बांधकामावर स्थगिती नाही [आदेश सविस्तर वाचा]
'कुलाबा-वांद्रे-सीप्झ' या (मेट्रो-3) भारतातील पहिल्या पूर्णत: भुयारी मेट्रो प्रकल्पामधील ५० टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेसाठी सुरु असलेल्या ५६ किमी भुयारीकरणाच्या प्रक्रियेपैकी २८ किमीचे भुयार खणून पूर्ण झाले आहे.