बईच्या पूर्व उपनगरातील पाच मशिदींच्या व्यवस्थापनाने अजानसाठी वापरले जाणारे लाऊडस्पीकर हटवण्याच्या नोटीशीप्रकरणी मंगळवार, दि. १ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात याचिकाकर्त्यांनी पोलिसांवर आरोप केला आहे की, या मशिदींना निरर्थक नोटिसा बजावून मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
Read More
फोब्सने नुकताच जाहीर केलेल्या आपल्या यादित मुंबईचा विशेष उल्लेख केला आहे. आतापर्यंत मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखली जायची. परंतू फोर्ब्सकडून आता भारतातल्या सर्वाधिक अब्जाधीशांचे शहर म्हणून मुंबईचा उल्लेख करण्यात आला आहे. फोब्सच्या आकेडवारीनुसार, अतिश्रीमंत रहिवाशांच्या वाढत्या संख्येसह हे मुबंई शहर यादीत अव्वल आहे.
दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला असून या प्रकरणात कोणताही लैंगिक अत्याचार किंवा हत्या झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत. अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केले होते. या प्रकरणात दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेत त्यांच्या मुलीच्या मृत्यूला गूढ व अमानवी स्वरूप असल्याचे नमूद करत, सीबीआय आणि उबाठाचे वरळीतील आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन, तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा मृत्यूही झाला आहे. मुंबई महापालिकेने महिनाभरात याबाबत मोहीम राबवून सर्व कबुतरखाने तात्काळ बंद करावेत. त्याचबरोबर कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांबाबत लोकांमध्ये जनजागृती करावी, असे मुंबई महापालिकेला दिल्याची माहिती निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवार, दि. ३ जुलै रोजी विधान परिषदेत दिली.
राज्य सरकार ठोस भूमिका घेणार का? प्रविण दरेकरांचा सभागृहात सवाल मुंबईतील पोलिसांच्या घरांचा प्रश्न अत्यंत दयनीय, बिकट आहे. जे पोलीस आपल्या संरक्षणाची काळजी घेतात तेही सुस्थितीत राहावे ही आपली जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांचे पोलिसांवर विशेष लक्ष आहे. त्यामुळे राज्य सरकार पोलिसांच्या घरांबाबत भूमिका घेईल का?, असा सवाल भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी प्रश्नोत्तराच्या चर्चेवेळी उपस्थित केला. विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना म्हणून साल २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने मान्यता देण्याचा आणि त्यांना 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उबाठा गटाने आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची विनंती उबाठा गटाचे वकील देवदत्त कामत यांनी बुधवार दि. २ जुलै रोजी केली असता, न्यायालयाने १४ जुलै रोजी सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.
भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, संजीव कुसाळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सहकारी राज्य संघाच्या संचालक निवडणुकीसाठी ‘सहकार पॅनल’चे २१ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या खऱ्या पण, गेल्या दोन महीन्यांत मुंबईतील ११ आंतरराष्ट्रीय शाळांना धमकीचे ई-मेल आले आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या बाबत मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात असे आढळून आले की, हे ई-मेल स्वीडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि नॉर्वे सारख्या देशांमधून ‘व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क’चा (व्हीपीएन) वापरून करून पाठवण्यात आले आहे. व्हीपीएन वापराने पाठवणाऱ्याची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुबंई पोलिसांनी सांगितले.
असंसदीय भाषा आणि अयोग्य वर्तनामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवार, दि.१ जुलै रोजी काँग्रेस आमदार नाना पटोले यांचे दिवसभरासाठी निलंबन केले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली, ज्यामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला आणि सभागृह पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
वर्धा नदीच्या किनाऱ्यावर होत असलेल्या अवैध रेती उत्खनन प्रकरणात कठोर कारवाई होईल. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी माहिती दि. १ जुलै रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आ.दादाराव केचे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देत ते म्हणाले.
दादरस्थित जुन्या महापौर बंगल्याचे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात रूपांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या २०१७ च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिका मंगळवार, दि. १ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावल्या आहेत. यामुळे स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
कुणीही अधिकचे व्याज देऊन पैसे देण्याचे आमिष दाखवत असल्यास त्याला बळी पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, १ जुलै रोजी राज्यातील जनतेला केले. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते.
बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, १ जुलै रोजी केली.
एक दिवस नाही तर रोज निलंबित केले तरी आम्ही थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. अयोग्य वर्तनामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवार, दि. १ जुलै रोजी त्यांचे दिवसभरासाठी निलंबन केले. त्यानंतर त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
कोणत्याही पक्षात हिंमत असेल तर त्यांनी मुंबईत स्वबळावर लढून दाखवावे, असे आव्हान मंत्री आशिष शेलार यांनी विरोधी पक्षांना दिले. मंगळवार, १ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी येत्या ५ जुलै रोजी विजयी रॅलीचे आयोजन केले आहे. दरम्यान, आता या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली आहे. आवाज मराठीचा, वाजत गाजत या, आम्ही वाट बघतोय, असे या पत्रिकेत म्हटले आहे.
रायगड किल्ला आज 'छत्र निजामपूर ग्रामपंचायत' या नावाने ओळखला जात असून ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे 'छत्र निजामपूर' हे नाव बदलून 'किल्ले रायगड ग्रामपंचायत' असे करण्याची अधिकृत मागणी करणारे निवेदन आ. गोपीचंद पडळकर यांनी मंगळवार, १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले.
काळाची गरज ओळखून शेतीमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. शेतीसाठी कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रद्यान वापरत उत्पादन वाढवून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यावर शासनाचा भर आहे, असे प्रतिपादन कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.
'संविधान बचाव' ची झाली शोभा, नाना, हे वागणं बरं नव्हं, अशी टीका भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेस नेते नाना पटोलेंवर केली आहे. मंगळवार, १ जुलै रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी असंसदीय भाषा आणि अयोग्य वर्तनामुळे नाना पटोले यांचे दिवसभरासाठी निलंबन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि एनबीसीसीमध्ये सामंजस्य करार. दि. १ जून रोजी नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता ‘आफ्रिकन सफारी’ अनुभवता येणार आहे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी विकसित करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि नॅशनल बिल्डिंग कंन्ट्रक्शन कार्पोरेशन (एनबीसीसी -India) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला
नाना पटोलेंनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. पण चर्चेत राहण्यासाठीसुद्धा त्यांना मोदीजींचेच नाव घ्यावे लागते. कारण बाप बाप होता है, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. मंगळवार, १ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे यांनीच राज ठाकरेंना पक्षाबाहेर जाण्यास प्रवृत्त केले. शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरेच पूर्ण जबाबदार आहे, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना नारायण राणे यांनी मंगळवार, १ जुलै रोजी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधला.
दक्षिण मुंबईतील ताडदेव येथे ३४ मजली इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम झाल्याबद्दल मुंबई महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने, मंगळवार दि.१ जूलै रोजी फटकारले. या प्रकरणी ‘विलिंग्डन व्ह्यू’ सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य सुनील बी. झवेरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठने सुनावणीदरम्यान इमारतीच्या बेकायदेशीर बांधकामवर चिंता व्यक्त केली.
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुनील शेट्टी यांनी मुंबईत एका सार्वजनिक कार्यक्रमात दिलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “मी कर्मभूमी मुंबईत आहे… इथं राहिलो, खाल्लं, कमावलं… पण मराठी बोललो नाही, तर स्वतःलाच त्रास वाटायला हवा.”
स्वयंपुनर्विकासाचा विषय पुढे जावा, योजनेकारिता पैसे उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली ‘दरेकर समिती’ नेमली. हे जबाबदारीचे शिवधनुष्य आहे. जनतेचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे म्हणून अपार कष्ट करत मी महाराष्ट्राचा दौरा केला, बैठका घेतल्या. ३१३ पानांचा अहवाल तयार असून त्याला अंतिम स्वरूप दिल्यानंतर पुढील आठवड्यात सरकारला सादर करू, अशी माहिती भाजपा गटनेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष व दरेकर समितीचे प्रमुख आ.प्रविण दरेकर यांनी दि.२९ जून रोजी दिली.
ताफ्यात ४ हजार ४८९ नव्या वाहनांची भर; मुंबईकरांची सुरक्षा आणखी भक्कम होणार मुंबई पोलीस दलाला सक्षम बनवत फडणवीस सरकारने शहराच्या सुरक्षेला नवी ताकद दिली आहे. गस्त अधिक प्रभावी, प्रतिसाद अधिक जलद आणि तपास अचूक व्हावा, यासाठी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात तब्बल ४ हजार ४८९ नव्या वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. गृह विभागाचा हा निर्णय पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.
खासगी विकासकाच्या भरवश्यावर न राहता स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून जुन्या इमारतींचा पुनर्विकास करता यावा यासाठी स्वयंपुनर्विकास कृती समिती, नवी मुंबईतर्फे आज, रविवार दि. २९ जून रोजी सकाळी १०.३० वाजता स्वयंपुनर्विकास विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शिबिराला भाजपा विधान परिषद गटनेते, मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपुनर्विकासाचे शिल्पकार आमदार प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हिताच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेससोबत युती करत मराठी माणसाशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी केल्याचा गंभीर आरोप मुंबई भारतीय जनता पक्षाचे सचिव प्रतिक कर्पे यांनी केला. “मराठीचे अस्तित्व पुसण्याचे काम उबाठा परिवाराने केले आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वसामान्य मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवेल,” असे कर्पे यांनी ट्वीटमध्ये ठणकावले आहे.
जर बँकेत तुमचे काही काम असेल तर आजच करुन घ्या. कारण उद्या शनिवार दि. २८ जून रोजी बँका बंद राहणार आहेत त्याचबरोबर २९ जूनला देखील रविवार आहे. त्यामुळे सलग दोन दिवस बँक बंद राहणार असल्याने बँकेत जाऊन करायची कामांमध्ये अडथळा निर्माण होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) आणि महागृहनिर्माण योजना, यांसारख्या प्रकल्पांमुळे नवी मुंबईचा वेगाने विस्तार होत आहे. याचा परिणाम म्हणून या प्रकल्प क्षेत्रांमध्ये पाण्याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासह नवी मुंबईच्या गतिमान विकासाला आधार देणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची आखणी सिडकोकडून करण्यात येत आहे.
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोेकल रेल्वेच्या प्रवासावर मुंब्रा येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. साहजिकच मुंबईकरांच्याही लोकल रेल्वे यंत्रणेकडून सुधारणेच्या प्रचंड अपेक्षा आहेत. पण, मागील ११ वर्षांत मुंबई लोकलच्या सेवेमध्ये निश्चितच काही सकारात्मक बदल झाले आहेत. त्यांचाच यानिमित्ताने आढावा घेणारा हा लेख...
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड प्रकल्पाच्या अखेरच्या टप्प्यातील सीएसटी रस्त्यावरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला नाला येथे उभारण्यात येणाऱ्या केबल स्टे पुलाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे. एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त (१) विक्रम कुमार यांनी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पस्थळास भेट देऊन अंतिम तयारीचा आढावा घेतला.
पाण्याचा जलद निचरा होणार; केंद्र सरकारकडून स्वतंत्र निधी मिळणार
मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. 24/2019 व रिट याचिका क्र.13864/2018 मध्ये पारीत केलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या परंतू भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न करता वापर सुरू केलेल्या इमारतींची यादी नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in यावर तसेच महानगरपालिकेची सर्व 8 विभाग कार्यालये याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लोकनेते दि.बा. पाटील यांच्या १२व्या स्मृतिदिनानिमित्त, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्याच्या मागणीस बळकटी देण्यासाठी मंगळवारी एक भव्य वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले. “दि.बा. पाटील नामकरण समर्थनार्थ भव्य कार, बाईक आणि रिक्षा रॅली” या उपक्रमाचे आयोजन लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आले.
मेट्रो ४च्या कामामुळे ठाण्यातील वाहतूक वळवली मुंबई मेट्रो लाईन ४ प्रकल्पांच्या अंतर्गत स्ट्रक्चरल गर्डर बसवण्याचे काम सुरु आहे. यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यानुसार, २२ जून ते १४ जुलै या कालावधीत रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत घोडबंदर रोडवरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.
धारावीत सुमारे ५,००० ते ६,००० उद्योग प्रकल्प चामडी उद्योगाशी संबंधित विविध कामांमध्ये गुंतलेली आहेत. धारावीतील चर्मोद्योग व्यावसायिकांनीही आता धारावी पुनर्विकास प्रकल्पात आपला सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पुनर्विकासावर चर्चा करून तोडगा निघावा, अशी केली मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे केली आहे.
"उबाठा सेनेची अवस्था धोकादायक आणि जिर्ण!" मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांची टीका शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
मुंबईतून प्रथमच शास्त्रीय स्तरावर 'इंडियन लायनफिश' माशाची नोंद करण्यात आली आहे (Lionfish in mumbai). सागरी संवर्धकांना या माशाचे दर्शन वांद्रे येथील कार्टर रोडच्या किनाऱ्यावर घडले (Lionfish in mumbai). यासंबंधीची नोंद 'आय-नॅचरललिस्ट' या आंतरराष्ट्रीय सिटीझन सायन्स संकेतस्थळावर करण्यात आली आहे. लायनफिशला शरीरावरील विषारी काट्यांसाठी ओळखले जाते. (Lionfish in mumbai)
प्रतिकुलतेवर मात करत समाजात सेवाकार्याने सकारात्मकता पेरणारे मूळचे बिदरचे, पण मुंबईत स्थायिक झालेले डॉ. ओमप्रकाश गजरे त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
पश्चिम रेल्वेकडून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर पावसाळ्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम हा मुंबईतील लोकलसेवेवर होतो. अनेकदा पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने ट्रॅकवर पाणी साचून मुंबईची लोकल सेवा रखडते. हेच पाहता मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नालेसफाई आणि इतर पावसाळापूर्व तयारी करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेने भुयारी नाल्यांच्या सफाईवर निरीक्षण ठेवण्यासाठी तरंगते कॅमेरे आणि थेट काल्वर्टमध्ये जात निरीक्षण करू शकणाऱ्या कामेरी मदत घेतली आहे. पावसाळ्यात दरवर्षी प्
शिवसेना संपली नाही म्हणत असताना, स्वतःतर ‘सेना’ गमावलीच, पण ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभही सोडून उद्धवजी तुम्ही सोनिया चरणी नतमस्तक झालात, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना शहराच्या बाहेरील भागात नाही तर मुख्य शहरात घरे प्रदान करणे, हे खऱ्या समानतेच्या दिशेने एक पाऊल आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवार, दि. १९ रोजी व्यक्त केले आहे. ‘एनजीओ अलायन्स फॉर गव्हर्नन्स अँड रिन्यूअल’ (NAGAR) या संस्थेनी विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली, (डीसीपीआर) २०३४ ला उच्च न्यायालयात एका याचिकेनद्वारे आव्हान दिले होते.
नवी मुंबई आणि रायगड भागातील गृहनिर्माण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या पहिल्याच उपक्रमात चाळीस वर्षांखालील तरुण रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना, क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे सिडको Exhibition सेंटर रविवार, २९ जून २०२५ रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत मेगा पुनर्विकास प्रदर्शन योजले आहे. आज नवी मुंबईतील हॉटेल ताज विवांता येथे रिअल इस्टेट उद्योगातील वरिष्ठ नेते, क्रेडाई एमसीएचआय युथचे पदाधिकारी आणि माध्यमांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
एकीकडे मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीच्या चर्चा सुरु असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसंदर्भात शरद पवारांनी मोठे विधान केले आहे. महाविकास आघाडी म्हणून आमची एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचे ते म्हणाले.
जागतिक संगीत दिनानिमित्त उद्या दि. २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव अंतर्गत आशा रेडिओ पुरस्कार २०२५चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ५ नामांकित आर जे देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. नरिमन पाँईट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी २ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी मान्
मुंबईत आज (गुरुवार, १९ जून) सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय. हवामान विभागाने शहराला ‘यलो अलर्ट’ जारी केला असून मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, नागिरकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेनेचा ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही पक्षांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, त्याआधीच मुंबईत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. उबाठा गटाच्या मुंबईतील अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
बुधवारी काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी जोरदार हजेरी लावली. तर चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. सकाळ पासून पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. हवामान विभागाने मुंबई आणि मुंबई उपनगराला अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तंविली आहे. तर रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील पुढील आठठेचाळीस तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने
अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या भीषण अपघातात जवळपास २७४ नागरिक मृत्यूमुखी पडले होते. हा अपघात विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे झाला असला, तरी ते विमान ज्या प्रकारे वसतिगृहाच्या इमारतीवर आदळले होते, त्याचा विध्वंस पाहून यशवंत शेणॉय यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर कुर्ल्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी, दि. १८ जून रोजी उच्च न्यायालयाला सांगितले की, उड्डाणांसा