मुंबई : मुंबईत आज (गुरुवार, १९ जून) सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय. हवामान विभागाने शहराला ‘यलो अलर्ट’ जारी केला असून मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, नागिरकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काल सोमवारी पहिल्या पावसानं ढगाळ वातावरण निर्माण केलं. कुलाबा आणि सांताक्रुझ मोजणी केंद्रांवर अनुक्रमे ३३१ मिमी आणि ३१७ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतुकीला मोठा त्रास झाला. कुर्ला, अंधेरी भागात पाणी साचल्यामुळे रहदारी ठप्प झाली होती. सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागत असून लोकल ट्रेन सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईत गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या १० वर्षात १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्याच्या दिवसांची संख्या वाढली आहे. तसेच चार तासात १२० मिमी ते २६७ मिमी दरम्यान पावसाची तीव्रता २८ वेळा नोंदवली गेली आहे. गेल्या सहा वर्षात पावसाच्या तीव्रतेची सरासरी १८२ मिमी झाली आहे.
पुढील २–३ दिवस पावसाची संभाव्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ ते ४८ तास मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु राहील. तसेच २० आणि २१ जून मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेसह अन्य यंत्रणा सतर्क झाल्या असून सखल भागांत पंपिंग स्टेशन तैनात करण्यात आले आहेत.