भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांनी माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, केरळचे शिक्षक आणि भाजप नेते सी. सदानंदन मास्टर तसेच इतिहासकार मीनाक्षी जैन यांना राज्यसभेसाठी शनिवार, दि.१२ जुलै रोजी जारी केलेल्या राजपत्रात या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
Read More
राजकारणात टीका असावी, यात व्यंगालाही स्थान आहे. पण, त्यामध्येही मर्यादेचे भान असणे आवश्यक ठरते. मात्र, याच मर्यादेचा विसर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पडल्याचे दिसत आहे. अलीकडेच मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौर्यांवर उपहासात्मक टीका करताना म्हटले की, "पंतप्रधान ज्या देशांत जातात, त्या देशांच्या लोकसंख्येपेक्षा आमच्याकडे जेसीबीभोवतीही जास्त माणसे जमतात.”
अन्याय करणाऱ्याला शनिदेव शिक्षा करतात अशी श्रध्दा आहे. शनी शिंगणापूरात कधी चोरी होत नाही म्हणून तेथील घरांना दरवाजे नाहीत. पण शनी शिंगणापूर देवस्थानातील विश्वस्तच देवाची फसवणूक करून उजळ माथ्याने मिरवत आहेत. शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थानात सुमारे अडीच हजार बोगस कर्मचारी दाखवून हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. पूजाविधीचे बोगस अॅप तयार करून त्या माध्यमातूनही भाविकांकडून कोट्यवधी रुपये उकळले जात असल्याची धक्कादायक माहिती शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी विधानसभेत देण्यात आली.
घाटकोपर पश्चिम येथील श्री खंडोबा टेकडीवरील ३०० झाडे तोडणाऱ्या बिल्डरची चौकशी करून, दोषी आढळल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी विधानसभेत केली. भाजप आमदार राम कदम यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा विषय उपस्थित केला होता.
कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि अनेकविध मोहिमांमध्ये दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल' असे करण्यात आले आहे. 'सिंदूर' नावामागे राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक दडले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वेपुलाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. नियोजित वेळेत प्रकल्पाचे आव्हानात्मक काम पार पडल्याबद्दलही मुख्यमंत्री फडणव
विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव अनुदान मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या शिक्षण सेवकांच्या आंदोलनाचे पडसाद काल विधिमंडळात उमटले. स्वाभाविकपणे, विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि सडेतोड उत्तराने मविआच्या दुटप्पी राजकारणाचा बुरखा फाडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवार ब्राझीलमध्ये अल्व्होराडा पॅलेस येथे ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांना ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान - "द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस" प्रदान करण्यात आला आहे.
राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यासंदर्भातयेत्या १५ दिवसांत एसओपी तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे राज्यातील ५० लाख कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
रितसर तक्रार करता आली असती, मारहाणीचे समर्थन करणार नाही आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दांत समज दिली आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने रितसर तक्रार करता आली असती, पण मारहाणीचे समर्थन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील वाशिम, भंडारा, अंबरनाथ आणि पालघर येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहेत. या महाविद्यालयांच्या बांधकामाकरिता जागा उपलब्ध होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. प्राधान्याने जागा उपलब्ध कराव्यात, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या बसेसच्या झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एस.टी. बसेस बाबत वारंवार नागरिक व लोकप्रतिनिधी यांचेकडून शासनाकडे निवेदन वा तक्रार करुनही नवीन बस खरेदी व बस स्थानकामध्ये सुधारणा करण्याबाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना व त्याची अंमलबजावणी का करण्यात येत नाही, असा सवाल राज्याच्या विविध भागातील आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसेसची कमतरता भरुन काढण्यासाठी रा.प. महामंड
छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल 'व्हिट्स'च्या लिलावातील गैर प्रक्रियेचे पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीने लिलावात राजकीय दबावाचा वापर केल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली.
राज्यामध्ये शासकीय रुग्णालयांत औषध खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्राधिकरणामार्फत औषध खरेदी करण्यात येते. मात्र औषध खरेदीला विलंब होत असल्यास औषधांची तातडीने उपलब्धता होण्यासाठी स्थानिक पातळीवरील प्रशासनाला एकूण अर्थसंकल्प तरतुदीच्या ३० टक्के पर्यंत औषध खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये कुठेही औषधांची कमतरता होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्य
राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कृत्रिम फुलावर बंदी घालण्यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ व ७ जुलै रोजी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे आयोजित केलेल्या सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभाग घेतला. जागतिक स्तरावर प्रशासनात सुधारणा, साउथ ग्लोबल देशांचा आवाज अधिक बुलंद करणे, शांतता आणि सुरक्षा, बहुपक्षीयता बळकट करणे, विकासाचे मुद्दे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासह ब्रिक्स कार्यक्रम सूचीवरील विविध मुद्द्यांवर सर्व नेत्यांनी चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा घानाच्या संसदेत केलेले भाषण हे केवळ औपचारिक नव्हते, तर जागतिक राजकारणाच्या भविष्यासाठी ते दिशादर्शक असेच. विश्वहितासाठी ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज आवश्यक आहे, या पंतप्रधानांच्या विधानातून भारताने एक स्पष्ट संदेश जगाला दिला. म्हणूनच लोकशाहीच्या सिंचनातून भारतरुपी बहरलेला हे विश्वहिताचा वटवृक्ष जगासाठी आशेचा किरण ठरावा.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील दुसऱ्या टप्प्यात ते त्रिनिदाद आणि टोबॅगो देशात पोहचले आहेत. त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील भारतीय समुदायाशी मोदींनी भारत आणि त्रिनिदादच्या चांगल्या संबंधांवर मोकळेपणाने संवाद साधला.
ए रवी कामाच्या ठिकाणी किंवा अगदी नातेवाईकांशी संवाद साधताना जपून वगैरे बोलण्याचा सल्ला आजही घरच्या ज्येष्ठांकडून आवर्जून दिला जातो. राजकारणात तर डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर ठेवूनच संवाद साधावा, हा सर्वश्रुत नियम; अन्यथा त्याचे किती भीषण परिणाम सहन करावे लागतात, ते गल्लीपासून ते दिल्लीच्या राजकारणापर्यंत आपण जाणतोच. पण, विषय नातेवाईक, राजकारणाचाही सोडा, त्याही पलीकडे परराष्ट्र संबंधाचा, कूटनीतीचा असेल, तर तिथे शब्द अन् शब्द हा अत्यंत काळजीपूर्वकच वापरायला हवा. मग ते राजदूत असो वा साक्षात देशाचा पंतप्रधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पोलिसांचे मानसिक आरोग्य, निवास आणि वैद्यकीय सुविधांवर विशेष लक्ष पोलिसांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य, तसेच त्यांच्या निवास सुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. ५० वर्षांवरील पोलिसांना वर्षातून दोनदा, तर ४० वर्षांवरील पोलिसांना वर्षातून एकदा आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. यासोबतच पोलिसांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि निवासाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २ जुलै रोजी विधानपरिषदेत सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना सुनावले खडेबोल शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांचेच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे, शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी असून, आमचे सरकार ती पार पाडेलच. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.
राज्यातील आदिवासी बहुल आठ जिल्ह्यांमध्ये नोकरीत आदिवासी समाजाला वाढीव आरक्षण देण्यासंदर्भात नुकतीच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली व रायगड या जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजासाठी आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यावर चर्चा या बैठकित करण्यात आली
एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची अत्यंत दुरावस्था आहे. तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणावर एसटी कर्मचारी आहेत. त्यामुळे तालुका-जिल्ह्याच्या ठिकाणी मोठी रुग्णालये आहेत का? की तकलादू छोटे-छोटे उपचार करणार आहोत, असा प्रश्न आ. प्रविण दरेकर यांनी प्रश्नोत्तराच्या चर्चेवेळी उपस्थित केला. त्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक उत्तर दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चालू अधिवेशनात कायद्यात सुधारणा करणार ‘एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास आता संघटित गुन्हेगारीअंतर्गत त्यांना ‘मकोका’ लावला जाणार आहे. त्यासाठी कायद्यात सुधारणा या अधिवेशनातच केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २ जुलै रोजी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आठवडाभर आंतरराष्ट्रिय दौऱ्यावर आहेत. घाना, त्रिनिदाद, टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांना पंतप्रधान भेट देणार आहेत. हा दौरा भारताचा आफ्रिकेशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दौरा आहे. २ ते ९ जुलै २०२५ हा दौरा चालणार आहे. घानाचे राष्ट्रपती जॉन ड्रामानी महामा यांनी घानाच्या अक्रा विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत केले.
नवीन कामगारांना एका महिन्याचे 15,000 रुपयांपर्यंतचे वेतन दोन हप्त्यांमध्ये मिळणार ; उत्पादन क्षेत्रावर भर आणि नवीन कामगारांसाठी प्रोत्साहनपर वेतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोजगार निर्मितीला बळ देण्यासाठी, रोजगारक्षमता वाढविण्यासाठी तसेच सर्व क्षेत्रांमध्ये सामाजिक सुरक्षा वाढविण्यासाठी, विशेषतः उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी रोजगाराशी संबंधित प्रोत्साहनपर (ईएलआय) योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी
डिसेंबर २०२५ पर्यंत आधुनिक प्रवासी आरक्षण प्रणाली प्रवाशांच्या सुविधांमध्ये भर घालण्याच्या दिशेने रेल्वे सतत पावले उचलत असते. नवीन पिढीच्या गाड्या सुरू करणे, स्थानकांचा पुनर्विकास करणे, जुन्या डब्यांचे नवीन एलएचबी डब्यांमध्ये श्रेणीवर्धन करणे अशा अनेक पावलांमुळे गेल्या दशकात प्रवाशांचा अनुभव सुधारला आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (सीआर आय एस) च्या ४०व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवार,दि.१ रोजी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे 'रेलवन' या नवीन ॲपचा
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास; चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड “भाजप सामान्य कार्यकर्त्यांना मोठे करणारा पक्ष आहे. ही परंपरा आजही आम्ही कायम ठेवली आहे. आपल्या कार्यकत्यांमधूनच एक धडाडीचा नेता प्रदेशाध्यक्षपदी आला आहे. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप अधिक वेगाने विस्तारेल,”असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. १ जुलै रोजी व्यक्त केला.
राज्यात लागू केलेल्या त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, "एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. "हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी रविवार, दि. २९ जून रोजी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठकपार पडली.
"भारतात आणीबाणी लागू करणार्यांनी केवळ आपल्या संविधानाची हत्या केली नाही; तर न्यायव्यवस्थेलाही त्यांचे गुलाम बनवण्याचा त्यांचा हेतू होता. या काळात लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात आले. शेवटी, जनतेचा विजय झाला, आणीबाणी उठवण्यात आली आणि आणीबाणी लादणार्यांचा पराभव झाला. अनेक लोकांना कठोर छळ करण्यात आला. ‘मिसा’अंतर्गत कोणालाही अटक करता येत होती. विद्यार्थ्यांनाही त्रास दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्यात आला,” असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आपल्या ‘मन की बात’ या १२३व्या कार्यक
दिवा मार्गावरील अपघाताने उपनगरी रेल्वेच्या जुन्या मागण्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खासदार कै. रामभाऊ म्हाळगी यांच्यापासून ते मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रयत्नांपर्यंत उपनगरी प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक तत्त्वज्ञ आणि संवेदनशील नेत्यांनी आवाज उठवला होता. पण रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजही प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे.
भारत – अमेरिका व्यापार करारावर ८ जुलैपर्यंत शिक्कामोर्तब होऊ शकते. मुख्य वाटाघाटीकार आणि वाणिज्य विभागातील विशेष सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील एक भारतीय पथक चर्चेला अंतिम स्वरूप देण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिघा येथे नव्याने उभारलेल्या जगन्नाथ मंदिराचा प्रसाद संपूर्ण राज्यभर वाटण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जय श्रीराम’ या घोषणेला विरोध करणार्या ममतांनी आता ‘जय जगन्नाथ’चा नारा दिला आहे. ममता यांना एकाएकी हिंदू धर्माबद्दल उमाळा का दाटून आला आहे, हे नव्याने सांगायला नको.
२८८.१७ कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा सिंधू जल करार रद्द केल्यापासून पाकिस्तान भारतासोबत विविध मार्गाने चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे. आता यातच पाकचे संरक्षणमंत्री असलेल्या ख्वाजा आसिफ यांचे ट्विट आगीत तेल ओतणारे ठरले आहे. आसिफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एक ट्विट करत, त्यांचा 'कसाई' म्हणून उल्लेख केला आहे. मात्र पाकिस्तानच्या माजी राजदूतांनी संरक्षण मंत्र्यांनाच उलट खडेबोल सुनावल्याचे दिसतेय.
ब्राझिल येथे ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी २ जुलैपासून ५ देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांमध्ये घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया यांचा समावेश आहे. ब्राझीलमध्ये ते ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होतील.
राष्ट्रपती राजवटीत असलेल्या मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या तयारीस वेग आला आहे. राज्यात लवकरच एक नवीन लोकप्रिय सरकार स्थापन होईल. यासंदर्भात आमदारांसोबत नियमित बैठका घेतल्या जात आहेत, असे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी सांगितले आहे.
'भारत ही जगातील सर्वात जुनी जिवंत संस्कृती आहे. आपले विचार, आपले तत्वज्ञान अमर आहे. या तत्वज्ञानाचे स्रोत आपले ऋषी, संत आणि आचार्य आहेत. आचार्य विद्यानंद जी महाराज हे भारताच्या या परंपरेचे आधुनिक दीपस्तंभ आहेत. ते म्हणायचे की जेव्हा जीवन सेवेने परिपूर्ण होते तेव्हाच जीवन धार्मिक बनू शकते. त्यांचा हा विचार जैन तत्वज्ञानाच्या मूळ भावनेशी तसेच भारताच्या चेतनेशी जोडलेला आहे.", असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जैन आध्यात्मिक गुरू आचार्य विद्यानंद महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त शनिवारी आयोजित
- भारतीयांसाठी ‘आकाक्षांपुढती गगन ठेंगणे’ – ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचा संदेश आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात भारताचे प्रतिनिधीत्व करणारे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे नवभारताचे प्रेरणास्थान आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कॅप्टन शुभांशू यांच्यासोबतच्या संवाददरम्यान केले.
पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांवनी पहलगामन येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दहशतवाद असेल तेथे नष्ट करण्याचे धोरण स्पष्ट केले आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘महावितरण’ने गेल्या अडीच वर्षांत राज्याच्या वीजपुरवठ्यासाठी केलेल्या नियोजनामुळे आगामी पाच वर्षांत कंपनीच्या वीजखरेदी खर्चात ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. ‘महावितरण’ने नवीकरणीय ऊर्जेवर भर दिला असून, त्यांचे वीजदर कायम राहणार असल्याने पाच वर्षांनंतर वीजदरात आणखी घट होईल. यानिमित्ताने ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचीत...
ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी या आपल्या पुण्याचे, कलेचे वैभव आहे. त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान आहे. त्यांना पद्म पुरस्कार मिळावा यांची शिफारस राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे करू, असा शब्द केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांनी आज दिला.
विशेष प्रतिनिधी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मंगळवारी १३ व्या पासपोर्ट सेवा दिनानिमित्त पासपोर्ट सेवा कार्यक्रमाच्या (पीएसपी) पुढील टप्प्याची आणि देशव्यापी ई-पासपोर्ट सेवा सुरू करण्याची घोषणा केली.
विशेष प्रतिनिधी चीनमधील किंगदाओ येथे २५ ते २६ जून २०२५ या कालावधीत यंदाची शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योगसाधना सत्रात भाग घेतला.
इराणसारख्या आपल्या कट्टर शत्रूदेशाने अण्वस्त्रे विकसित करु नये, म्हणून आताच नाही तर गेल्या काही दशकांपासून इस्रायलने आक्रमकपणे रणनीती अवलंबली. आजही इस्रायलने तितक्याच त्वेषाने इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी सर्व ताकद एकवटलेली दिसते. परंतु, दुर्दैवाने पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मिती प्रक्रियेला कायमस्वरुपी अंकुश लावण्यात भारताचे तत्कालीन काँग्रेसी नेतृत्व अपयशी ठरले. पण, त्याच काँग्रेसी नेतृत्वाचे राजकीय उत्तराधिकारी असलेले राहुल गांधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावाखाली असल्याच्या बात
कॅनडामधील अल्बार्टा प्रांतातील कनानास्किस येथे दोन दिवसीय ‘जी-७’ शिखर परिषद नुकतीच संपन्न झाली. युद्धजन्य स्थितीवर एक औपचारिक संयुक्त निवेदन, इस्रायलला पाठिंबा आणि इराणच्या अण्वस्त्रनिर्मिती विरोधात ठराव, ही ‘जी-७’ गटाच्या कॅनडातील परिषदेची प्रमुख वैशिष्ट्ये. पण, त्याहीपेक्षा अधिक चर्चिली गेली ती ट्रम्प यांची धावती भेट. तसेच या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाश्चात्त्य देशांच्या दहशतवादाविषयक दुटप्पी धोरणांचाही कठोर शब्दांत समाचार घेतला. यानिमित्ताने ‘जी-७’ परिषदेच्या फलश्रुतीचा आढावा घेणार
विशेष प्रतिनिधी केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि कांग्रेस नेते व्ही.डी. सतीसन यांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) भाजपशी संधान असल्याचा आरोप केला. त्यांनी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर केरळमधील मुस्लिम बहुल जिल्हा असलेल्या मलप्पुरममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (रा. स्व. संघ) अजेंडा राबवित असल्याचाही आरोप केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात दर्शन घेतले. तसेच याच परिसरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील बळीराजा सुखी राहावा, सर्व नागरिकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि महाराष्ट्राच्या यशाचा झेंडा उंच
“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते.
मावळ तालुक्यातील कुंडमाळा परिसरात इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल कोसळल्याने रविवार दि. १५ जून रोजी, मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.