संपूर्ण जगातील औषधशास्त्र हे एकच आहे. सर्व औषध प्रणालींचा एकच उद्देश असतो व तो म्हणजे रोग्याला रोगमुक्त करणे. होमियोपॅथीमध्ये रोग्याला नुसते रोगमुक्त करून काम भागत नाही, तर त्या माणसाची निरोगी स्थिती कशी अबाधित राहील, यावरही खूप मेहनत घेतली जाते व प्रयत्न केले जातात. अॅलोपॅथी काय किंवा होमियोपॅथी काय, या दोन्ही शाखांमध्ये सर्व समान विषयच शिकवले जातात.
Read More
अनेक भारतीय शास्त्रांपैकी योग व मानसशास्त्र यांच्यावर अमेरिकेत होत असलेल्या संशोधनात भाग घेतलेल्या व अशाच इतर ठिकाणी भाग घेतलेल्या डॉ. आइन्स्टाईन व डॉ. ग्रीन यांसारख्या संशोधकांबरोबर चर्चा केलेल्या जगप्रसिद्ध सामाजिक मानसशास्त्रज्ञ, संशोधक व अध्यापक डॉ. पंढरीनाथ प्रभू यांनी लिहिलेल्या ‘भारतातील शास्त्रांचा उद्गम व विकास ः मानससामाजिक मूलाधार व आज घ्यावयाचे धडे,’ यात अनेक संदर्भ तपासून लिहिलेल्या व विद्वानांची मान्यताप्राप्त ग्रंथातील विवेचन नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने थोडक्यात मां
शरीराच्या प्रकृतीनुसार, ठेवणीनुसार, तसेच माणसाला जनुकीय जडणघडणीनुसार रोगप्रवणस्थिती तयार असते, त्याचप्रमाणे माणसाच्या आजूबाजूच्या वातावरणाचा, पर्यावरणाचा, हवेचा, भौगोलिक परिस्थितीचासुद्धा माणसाच्या शरीरावर परिणाम होत असतो
रोगाचे मूळ निदान करायचे झाल्यास, रोग हा माणसाच्या मूळ चैतन्यशक्तीमध्ये होणारा बिघाड असतो, जो सर्वप्रथम माणसाच्या संवेदनांमधून व नंतर अवयवांच्या कार्यामधून शरीरावर दिसू लागतो, ज्यालाच आपण चिन्हे व लक्षणे असे म्हणतो. या विविध लक्षणे व चिन्हे यांनी मिळूनच हा रोग बनलेला असतो. यावरुन हेच सिद्ध होते की, रोग हा कुठल्याही प्रकारचा स्थानिक व पेशीनिहाय बिघाड नाही, तर मूळ चैतन्यशक्तीमध्ये झालेला असमतोल असतो. पेशींमध्ये दिसणारे बदल हे या मूळ चैतन्यशक्तीच्या बिघाडाचा निकाल स्वरुप असतात.
होमियोपॅथीसाठी पूर्वी स्वतंत्र विभाग सरकार दरबारी नव्हता. जसे आपण पाहिले की, आयुर्वेदसंचालनालयच होमियोपॅथीला नियंत्रित करत होते. त्यानंतर पुढील काळात ‘आयुष’ मंत्रालयाची स्थापना झाली व त्यानुसार होमियोपॅथीला ‘आयुष’ मंत्रालयात जागा मिळाली. परंतु, केवळ ‘आयुष’मध्ये समावेश होऊन काहीही झाले नाही, तर हा सापत्नभाव चालूच राहिला.होमियोपॅथीमध्ये शिकणारा विद्यार्थी हा ‘एमबीबीएस’ला शिकणार्या विद्यार्थ्याप्रमाणे सर्वच विषय शिकत असतो.