व्हिएतनाममध्ये रामकथेचा सांस्कृतिक प्रभाव अत्यंत खोल असून, तेथील समृद्ध परंपरेचा तो एक भाग आहे. प्राचीन ‘चम्पा’ राजवंशाने भारतीय संस्कृतीशी असलेली आपली नाळ अधिक दृढ केली आणि रामकथेचा प्रसार व्हिएतनाममध्ये केला. ‘चाम’ व ‘खमेर’ समाजांनी आपल्या नृत्यनाट्य परंपरांमधून, रामायणाच्या कथा आणि पात्रांना सजीव ठेवले. ‘त्रुयेन कियू’ आणि ‘रोबन याक’ सारख्या लोककला प्रकारांमध्ये रामकथेतील मूल्ये, नीतिकथा आणि आदर्श यांचे प्रभावी दर्शन घडते. बौद्ध संस्कृतीत देखील रामकथेची छाया जाणवते, जिथे प्रभू राम आदर्श पुरुष व धर्मनिष्ठ
Read More
भारताबाहेर मानवनिर्मित भूभागांची बंधने ओलांडून, सार्या नात्यांच्या पलीकडले असे रामायणाचे नाते, समस्त जगभरातील मानवसमूहाशी जुळले आहे. कोण वाल्मिकी, कुठे राहिले, कधी होऊन गेले, याची काहीही उठाठेव न करता सगळ्याच आशियाई देशवासीयांनी, रामकथेचे आकंठ रसपान केले आहे. भारतीय दर्यावर्दी प्रवासी, व्यापारी आणि बौद्घ भिक्षू यांच्याबरोबर, रामायणसुद्घा दक्षिण-पूर्वेकडील देशांत पोहोचले. रामायणातील शाश्वत जीवनमूल्ये आणि कर्तव्यपरायणतेची शिकवण यामुळे भारावून जाऊन, त्यांनी ते काव्य आत्मसात केले आणि आपापल्या भाषेत त्याचा अविष
भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, भाषिक, व्यापारी अशा विविध प्रकारे भारताशी जोडला गेलेला देश म्हणजे म्यानमार उर्फ ब्रह्मदेश. अशा ब्रह्मदेशात रामकथेचे अयन झाले नसते, तरच नवल! तेव्हा, म्यानमारच्या जनमनामध्ये रुजलेल्या रामकथेविषयी...
संस्कृत ही आपली प्राचीन भाषा असून, ‘देववाणी’ म्हणून तिचा गौरव केला जातो. एवढेच नव्हे, तर जगातील भाषांपैकी सर्वात प्राचीन म्हणूनही तिचे स्थान आहे. संस्कृत भाषेतील साहित्य हा भारतीयांचा ऐश्वर्य ठेवा आहे. संस्कृत काव्ये आणि नाटके, कवी आणि नाटककार यांच्या साहित्यकृतीने, भारतीय संस्कृतीला समृद्ध, संपन्न केलेले आहे. संस्कृत नाटककारांमध्ये भास यास, ‘आदि नाटककार’ मानले जाते. त्याची 13 नाटके प्रसिद्ध आहेत. त्या नाट्यचक्रातील ‘प्रतिमा’ आणि ‘अभिषेक’ अशी दोन नाटके, रामकथेवर आधारित आहेत. ही दोन्ही सुखान्त नाटके रामराज्य
मागील लेखात आपण पाहिले की, मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक १७९ मध्ये, समर्थांनी ‘थोरला देव’ असा सृष्टीनिर्मात्याचा उल्लेख केला आहे. परंतु, तो देव गुप्त आहे, असे म्हटले आहे. कारण, त्याला जाणण्यासाठी जी सूक्ष्मतिसूक्ष्म अनुभूती घेणारी प्रतिभा, तसेच देहबुद्धी व अहंकाराचा त्याग करून मिळालेली अतींद्रिय ज्ञानदृष्टी लागते, ती आपल्या ठिकाणी नसल्याने आपल्यासाठी थोरला देव हा गुप्त आहे, असे वाटते. तथापि, हे सर्व गुणविशेष ज्याच्या ठिकाणी एकत्र आढळतात, अशा साक्षात्कारी सत्पुरुषाचे शिष्यत्व पत्करल्याशिवाय, आपण ती अतींद्र
प्रभू श्रीरामांची अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना ( Shri Ram's Temple ) होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या मंदिरनिर्माणाची वाट कित्येक पिढ्यांनी पाहिली, तो क्षण ‘याचि देहे याचि डोळा’ आपण अनुभवला. या घटनेचे असंख्य कंगोरे आहेत. या कंगोर्यांचा घेतलेला हा मागोवा.
नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटाची गेल्या अनेक काळापासून चर्चा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत असून दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने मासांहार सोडल्याच्या चर्चा सध्या सोशल मिडियावर रंगल्या आहेत. यावर आता साई पल्लवीनेच प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चित्रपटात नेमके कोणते कलाकार कोणती भूमिका सादर करणार यावरुन रंगणारी चर्चा आता पुर्णविरामापर्यंत आली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. 'रामायण' या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका रणबीर कपूर, सीता मातेची भूमिका साई पल्लवी साकारणार यावर फार आधीच शिक्कामोर्तब झाला आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटाची प्रेक्षक सध्या आतुरतेने वाट पाहात आहेत. कारण, या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारणार असून माता सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे. गेले अनेक दिवस या चित्रपटाबद्दल आणि यात विविध भूमिका साकारणाऱ्या कलाकारांबद्दल चर्चा सुरु होती. आणि आता या चित्रपटातील विशेष भूमिकेबद्दल पहिल्यांदाच व्यक्त होत रणबीर म्हणाला की, 'रामायण' मधील भूमिका हा माझा ड्रीम रोल होता”.
'रामललाने तब्बल ५०० वर्षांनंतर अयोध्येत होळील खेळली असून मथुरा-वृंदावनचे रस्तेदेखील या क्षणाची वाट पाहत होते, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मेरठ येथील प्रबुध्द परिषदेत केले आहे. ते म्हणाले, "आम्ही 'होली खेले रघुवीरा अवध में' हे भजन खूप ऐकले आहे, परंतु पाचशे वर्षांत प्रथमच, मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी त्यांच्या धाम अयोध्येत बसून होळी साजरी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
वाल्मिकी रामायणानंतर संस्कृत वाङ्मयामध्ये अनेक रामायणे लिहिली गेली. त्या असंख्य रामायणांमध्ये ‘अध्यात्म रामायण’ हे शिवपार्वती संवादरूप रामायण सर्वाधिक लोकप्रिय आहे. ‘अध्यात्म रामायण’, ‘अद्भुत रामायण’, ‘आनंद रामायण’ अशा अनेक रामायणांपैकी ‘अध्यात्म रामायण’ रामानंदी संप्रदायामध्ये अधिकृत प्रमाण ग्रंथ मानला जातो. श्रीराम हा भगवान विष्णूचा अवतार असून, परब्रह्म स्वरूप आहे. या रामकथेमध्ये ज्या-ज्या घटना-प्रसंग घडतात, त्याचा कर्ता करविता, पडद्यामागचा सूत्रधार श्रीराम आहे. कोणाही व्यक्तीला दोष न देता, ‘प्रारब्ध’ हे
राम आणि रामनाम यानेच आपली सर्व संकटे दूर होऊन आपण ‘पूर्णकाम’ होऊ. यासाठी सकाळी रामाचे, त्याच्या गुणांचे चिंतन करून आपल्या दिवसाची सुरुवात करावी. रामनाम हे सर्व साधनांचे सार आहे तेव्हा उगीच शंका, संशय न घेता रामनामाची प्रचिती घ्यावी.
देवतेसमोर शंख, घंटा आदी वाद्ये वाजविली जाण्याचा व आरत्या इत्यादी म्हणण्याचा परिपाठ केवळ वैदिक म्हणजे हिंदू समाजातच आहे. एका ख्रिश्चन मित्राने लेखकाला मोठ्या अविर्भावाने प्रश्न केला की, ‘तुमच्या मंदिरात देवासमोर घंटा का लावता व वाजविता?’ प्रश्न खरोखरीच मार्मिक होता, इतका मार्मिक की अधिकांश लोकांना त्याचे उत्तर देणे कठीण आहे. एकदम सरळ उत्तर न देता लेखकाने त्याला प्रश्न केला, ’आम्ही देवासमोर घंटाच नव्हे, तर झांज, मृदुंगादी सर्वच वाद्ये वाजवित असतो. तसे आम्ही का वाजवीत असतो, यामागे साधनामार्गात अनुभवाला येणार्
अयोध्या नगरीमध्ये सर्व प्रकारच्या ज्ञानज्योतीने म्हणजेच विवेकाच्या प्रकाशाने आच्छादलेला तसेच सर्व प्रकारच्या सुखांकडे घेऊन जाणारा असा एक सोनेरी कोश आहे. हा नेहमीच चमकणारा आहे. हा कोश म्हणजेच उत्तम प्रकारच्या ऐश्वर्याचा व ज्ञानाचा कोश! याला प्राप्त करून दिव्य जन आनंद मिळवतात व आपले जीवन यशस्वी करतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत आभासी बैठक घेतली आणि अयोध्या शहराच्या भविष्यातील दृष्टीचा आढावा घेतला. आभासी बैठकीला उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासह उत्तर प्रदेश सरकारच्या इतर मंत्र्यांनीही हजेरी लावली.
हिंदूंच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट
धर्म ही अफूची गोळी मानणाऱ्या मार्क्सच्या विचारधारेनुसार चालणारा, आणि त्यातही विशेषतः हिंदू धर्मावर जरा अधिकच राग असणारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षदेखील अखेर प्रभू रामचंद्रांना शरण आला आहे
मागचे काही दिवस साहित्यातून येणारी रामकथा पहिली. वेगवेगळ्या देशातील, काळातील, धर्मातील व भाषेतील - नाटक, काव्य व कथा रूपातली रामकथा पहिली. आज रामकथेचा चित्र, शिल्प, नृत्य व नाट्य अविष्कार.