२०२५ मध्ये भारतात कोविड-१९ रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या देशात ५,३६४ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत ७६४ नवीन रुग्ण आढळले असून, ४ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळ राज्यात सर्वाधिक १९२ नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात ११४, गुजरातमध्ये १०७, पश्चिम बंगालमध्ये ५८, आणि दिल्लीमध्ये ३० नवीन रुग्ण आढळले आहेत.
Read More
महाराष्ट्रात सध्या आढळणाऱ्या सर्व कोरोनाबाधितांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यात जानेवारी २०२५ पासून १२ हजार ११ कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८७३ रुग्ण बाधित आढळले. यापैकी ३६९ रुग्ण बरे झाले असून, सध्या सक्रिय रुग्णसंख्या ४९४ इतकी आहे. मुंबईत या काळात ४८३ रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईतील कोविड रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ होत असली, तरी घाबरण्याची गरज नाही. मात्र, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा गंभीर स्वरूपाचे आजार आहेत, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणे गरजेचे असल्याचे मत कोविडविषयक आढावा बैठकीत तज्ज्ञांनी व्यक्त केले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. २ जून रोजी ही बैठक संपन्न झाली
जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसनुसार, बुधवार १३ मे २०२५ रोजी ग्रीसमधील क्रेते बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप ८३ किलोमीटर खोलवर झाला असल्याचे जीएफझेडने सांगितले आहे. कोणत्याही जीवितहानी किंवा मोठ्या मालमत्तेच्या नुकसानीची नोंद नाही. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथकांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
( Special precautions in Mumbai after Pahalgam attack ) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्यात येत आहे. “मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख करण्यात येत आहे,” अशी माहिती मुंबई आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे.
आपल्या कष्टाचे, मेहनतीचे पैसे गुंतवणूकदार मोठ्या विश्वासाने एखाद्या कंपनीत अथवा वित्तीय संस्थेत गुंतवतात. अल्पकालीन लाभही त्यांच्या पदरी पडतात पण, कालांतराने गुंतवणूक केलेली संस्थाच फसवणूक करीत असल्याचे उघडकीस येते आणि गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांची आयुष्यभराची जमापुंजीच क्षणार्धात नाहीशी होते. मुंबईत अलीकडे उघडकीस आलेला ‘टोरेस’ कंपनीचा घोटाळा असेल किंवा ‘न्यू इंडिया बँके’तील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचे प्रकरण, गुंतवणूकदारांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना संपूर्ण खबरदारी घेणे अत्यंत म
मुंबई, पुणे, सोलापूरमध्ये सध्या ‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ ( Guillain Barre Syndrome ) या दुर्मीळ आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. तेव्हा, या आजाराची लक्षणे आणि उपचार याविषयी...
देशातील कोरोना लसीकरणाचा आकडा २०० कोटींच्या पुढे गेला आहे.
भारतीय हवामान खात्याकडून (आयएमडी) राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दि. ८ जुलै २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार (६४ मिमी ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे बोर्ड सतत नवनवीन गोष्टी करत असते. आताही भारतीय रेल्वेने प्रवाश्यांच्या खबरदारीचा उपाय म्हणून नवीन सूचना जाहीर केल्या आहेत. रेल्वेने म्हटले आहे की, यापुढे मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चार्जिंगसाठी करण्यात येणारा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
मागील लेखात आपण पृथ्वीच्या पोटात शिरून तिच्या रचनेविषयी माहिती घेतली. याचबरोबर भूकंपलहरींचाही थोडासा अभ्यास केला. या लेखात आपण तोच अभ्यास पुढे नेऊन भूकंपलहरी व भूकंप यांविषयी माहिती घेऊया.