भारताची अर्थव्यवस्था वेगवान आणि मजबूत स्थितीत असल्याचे अनेक संस्थात्मक अहवालामध्ये सुतोवाच केल्यानंतर आज नवा अहवाल पुढे आले आहे. The Confederation of Indian Industry (CII) ने आपल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ८ टक्क्यांनी वाढेल. विशेषतः शेतकी व सेवा क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना मिळाल्याने होऊ शकते. या क्षेत्रातील वाढती मागणी व लोकांच्या खर्चातील झालेली वाढ यामुळे ही वाढ अपेक्षित असल्याचे सीआयआय (CII) ने म्हटले.
Read More
घटलेल्या मागणीमुळे गेल्या ५ महिन्यातील सेवा क्षेत्रात घट झाली असल्याचे एचएसबीसी इंडिया सर्व्हिस परचेसिंग मॅनेजर या अहवालात म्हटले गेले आहे. एस अँड पी ग्लोबलने हा अहवाल प्रसिद्ध केला असून यामध्ये ५ महिन्यात मागणी घटल्याचा फट का सेवा क्षेत्रात बसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र सेवा क्षेत्रातील निर्यातीतील वेग वाढला असून २१ महिन्यातील रोजगारी निर्मि तीत सर्वाधिक वाढ झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
भारतातील खाजगी क्षेत्रातील कारभारात मोठी वाढ झाली आहे. जुलै २०१० नंतर खाजगी क्षेत्रातील कामगिरीत सर्वाधिक वाढ झाली आहे. देशातील सकारात्मक स्थिती, वाढलेली मागणी, वाढलेले उत्पन्न यामध्ये वाढ झाल्याने खाजगी क्षेत्रातील वाढ झाल्याचे खाजगी अहवालात म्हटले गेले आहे.
गेल्या १८ वर्षांत भारताची सेवा क्षेत्रातील निर्यात ही दुपटीहून अधिक वाढली असून, २०३० पर्यंत ती ८०० अब्ज डॉलरचा टप्पा गाठेल, असा अंदाज ‘गोल्डमन सॅक्स’च्या अहवालात नुकताच वर्तविण्यात आला आहे. मोदी सरकारच्या सेवा क्षेत्राच्या कासासाठी अनुकूल ध्येय-धोरणांचाच हा परिपाक म्हणावा लागेल.
औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन व बांधकाम क्षेत्रातील उभारीनंतर आता सेवा क्षेत्रात बरेपैकी वाढ होण्याची शक्यता आहे. तसे संकेत एका अहवालाने दिले आहेत.सेवा क्षेत्रात विविध कंपन्यांच्या सेवा जसे की टेलिफोन, मिडिया, कन्सल्टन्सी,आरोग्य, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान अशा विविध सुविधा येतात. ५ मार्चला दर्शविण्यात आलेल्या अहवालात म्हटल्याप्रमाणे सेवा क्षेत्रात महागाईचा आकडा कमी होत मागील काळाच्या तुलनेत यंदा सेवा क्षेत्रातील वाढ कायम राहणार नाही. अत्यंत वेगाने नसली तरी चांगल्या प्रकारे सेवेत वाढ होण्याची शक्यता आहे.
अलीकडच्या भारतीय निर्यातीच्या आकड्यांनी भारतीयांच्या मनात आनंद निर्माण केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात केवळ वस्तूंच्या निर्यातीतून ४२० अब्ज डॉलर्सचे परकीय चलन भारताला मिळणे, ही बाबा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे