पिरामल समुहाने बायोडील फार्मास्युटिकल प्रकल्पासाठी ११० कोटींची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. या कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट व मॅनुफॅचरिंग कंपनी आपल्या तंत्रज्ञानात नूतनीकरण आणणे तसेच मूलभूत सुविधांमध्ये भर टाकण्यासाठी समुहाकडून हा निधी गुंतवणूक करण्यात येणार आहे. पिरामल समुह यासाठी ११० कोटींची गुंतवणूक करेल असे कंपनीने अधिकृत निवेदनात सांगितले आहे.
Read More
पिरामल रियल्टी आणि इस्कॉन Iskon Temple Thane यांच्या संयुक्त विद्यमाने पिरामल वैकुंठ, ठाणे येथे श्री श्री राधा गोविंददेव मंदिराचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. १७ मार्च रोजी संपन्न झाला. यावेळी पिरामल एंटरप्राइजेस लि.चे चेअरमन अजय पिरामल आणि इस्कॉनचे गौरंग दास प्रभू उपस्थित होते. एखाद्या सोसायटीमध्ये उभारण्यात आलेले इस्कॉनचे हे महाराष्ट्रातील पहिले मंदिर आहे.
पिरामल ग्रुपने राजस्थानातील जयपूरमध्ये पिरामल स्कूल ऑफ लीडरशिप सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. पिरामल ग्रुपकडून जयपूर येथे लीडरशिपचा शिलान्यास करण्यात आला आहे.
पिरामल इंटरप्राईजेसचे उद्योगपती अजय पिरामल यांनी 'इंडियन एक्स्प्रेस ' ला विशेष मुलाखत दिली आहे. मॅन्युफॅक्चर ( उत्पादन) क्षेत्राच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, व्याजदर, विकास दर, आर्थिक मूल्यमापन अशा अनेक विषयांवर त्यांनी आपल मत व्यक्त केले आहे. विशेषतः ८ टक्के जीडीपीचा दर गाठण्यासाठी गव्हर्नन्स मध्ये समाधानी असले तरी अजून गती हवी असे परखडपणे अधोरेखित केले आहे. सध्याच्या महागाई, करन्सी अशा काही 'Volatile' मार्केट मध्येही देशाच्या प्रगतीसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने चांद्रयान ३ मोहीम फत्ते करत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान उतरविणारा पहिला देश म्हणून बहुमान मिळविला. सबंध जगभरातून इस्त्रोच्या अतुलनीय कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळाले. त्यातच आता लिंक्डइन या वाणिज्य आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिष्ठित वेब पोर्टलवर एका पोस्टने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. पिरामल इंटरप्रायझेसचे ग्रुप हेड राजीव बॅनर्जी यांनी इस्त्रोच्या चांद्रयान ३ मोहीमेच्या यशावर एका व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
‘पिरामल फाऊंडेशन अॅण्ड स्टॅण्डर्ड चार्टर्ड बॅँके’ने सात राज्यांमधील १२३ गावे आणि २५ शाळांमध्ये जलसुरक्षा आणि शाश्वत जलस्रोतांसाठी काम करण्याच्या हेतूने सुरक्षित ‘पेयजल’ प्रकल्प हाती घेतले आहेत. पंतप्रधानांच्या अमृतकाल उद्दिष्टांशी मेळ साधत या गावांतील समुदायांनी कार्यक्षम कृषिपद्धती आणि जलसंवर्धन तसेच सांडपाणी व्यवस्थापनाच्या प्रयत्नांतून जलसुरक्षेच्या दिशेने उचललेले हे मोठे पाऊल आहे. त्याविषयी...
‘पिरामल ग्रुप’चे अध्यक्ष अजय पिरामल आणि उपाध्यक्ष डॉ. स्वाती पिरामल यांनी ‘पिरामल फाऊंडेशन’ने देशातील सर्वात गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी घेतलेल्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी आदिवासी आरोग्य आणि कल्याण, शिक्षण, जलसंधारण, आयुष्मान भारत आणि ‘डिजिटल हेल्थकेअर सेवा’ या क्षेत्रांमध्ये ‘पिरामल फाऊंडेशन’ने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणारे ’डुईंग वेल अॅण्ड डुईंग गुड’ हे पुस्तक राष्ट्रपतींना देण्यात आले.