occasion of Nurses Day 2025 visionary initiative
Read More
Dr. Babasaheb Ambedkar : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपण संविधान निर्माते म्हणून ओळखतो मात्र डॉ. बाबासाहेब हे फक्त संविधानापुरते मर्यादित नसून त्यांची ओळख ही आणखीनही उल्लेखनीय आणि ऐतिहासिक कार्य रत्नांनी जडलेली आहे. त्यावर विशेष प्रकाश टाकण्याची आवश्यकता आहे. म्हणून डॉ .बाबासाहेबांकडे पाहताना बाबासाहेबांचे इतरही उल्लेखनीय कार्य जसे की "हिंदू कोड बिल", औद्योगिक क्षेत्रातील बदल, स्त्रियांसाठीचे कायदे, कामगार कल्याणासाठी केलेल्या तरतुदी अर्थतज्ञ बाबासाहेब, पाणी तज्ञ बाबासाहेब अशा एक ना अनेक आर्थिक, सामाजिक आणि
समाजात अगदी पूर्वापार सद्प्रवृत्ती विरुद्ध दुष्प्रवृत्तींचा संघर्ष अविरत सुरुच आहे. कालपरत्वे जरी या संघर्षाचे स्वरुप बदलले असले तरी सज्जन, दुर्जनांची विविध रुपे आजही अगदी सहज दृष्टिक्षेपास पडतात. पराकोटीची स्वकेंद्रीत ( Self Centered ) वृत्ती आणि नकारात्मकतेने भारलेल्या काही व्यक्ती, आपलेच खरे करण्याच्या नादात सज्ञान व्यक्तींनाही मूर्खात काढतात. आपले अज्ञान उघडे पडू नये, म्हणून शब्दच्छल, लपवालपवीचाही ते सोयीस्कर आधार घेतात. अशा या ‘संज्ञानात्मक विसंगती’विषयी..
मुंबई : ( Bhatkhalkar ) ज्या नबाब मलिकांना केंद्रीय तपास यंत्रणांनी तुरुंगांत पाठवले, त्यांना ज्यांनी मंत्रिपदावर कायम ठेवले, ते लोक आम्हाला टार्गेट करीत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसने कायम आरक्षण संपविण्याची भाषा केली, तेच लोक आता उघडे पडले आहेत. मी आता प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यामुळे जवळपास एक लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास कांदिवली पूर्वचे आ. अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’सोबत साधलेला विशेष संवाद...
‘फॉक्सकॉन’चे सीईओ आणि तैवानी नागरिक असलेले यंग लिऊ यांना नुकताच ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘पद्मभूषण’ पुरस्कार यादीतील ते एकमेव विदेशी नागरिक. लिऊ यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर करणे हा ‘फॉक्सकॉन’च्या भारतातील आजवरच्या योगदानाचा हा सन्मानच. तसेच या पुरस्काराने चीनला शह देण्याबरोबरच ‘फॉक्सकॉन’च्या भारतीय गुंतवणुकीचा मार्गही अधिक प्रशस्त केला आहे. त्याचे आकलन...
'गजानन विजय ग्रंथ’ - आधुनिक महिपतीचे अवतार समजले जाणार्या ह. भ. प. दासगणु महाराजांनी लिहिलेली ही २१ अध्यायांची पोथी. त्यात १५व्या अध्यायात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे वर्णन आढळते. आपल्याला यातूनच टिळकांची महती कळते. जशी ही धर्म व अध्यात्मातील महती आपल्याला आढळते तशी अनेक ठिकाणी टिळकांची महती आपल्याला आढळते. अशा टिळकांची जयंती व पुण्यतिथी आपण दरवर्षी साजरी करतो. तशीच आज आपण ती साजरी करत आहोत. त्यानिमित्ताने...